Download App

…अन् किर्लोस्कर पुन्हा ऑफिसला जायला लागले, शरद पवारांनी सांगितला प्रेरणादायी किस्सा

अमेरिकेत ह्रदयविकाराची शस्त्रक्रिया केल्यानंतर शंतनूराव किर्लोस्कर पुन्हा ऑफिसला जायला लागले असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. लेटस्अप मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Sharad Pawar News : अमेरिकेत ह्रदयविकाराची शस्त्रक्रिया केल्यानंतर शंतनूराव किर्लोस्कर (Shantanu Kirloskar) पुन्हा ऑफिसला जायला लागले असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी लेटसअप मराठीला स्पेशल मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं असून यावेळी त्यांनी उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर यांच्या भेटीचा प्रेरणादायी किस्सा सांगितला आहे.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी शंतनू महाजनांच्या एका भेटीबद्दलचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी शरद पवार यांनाही तोंडाचा कॅन्सर झाला होता, तर शंतनू किर्लोस्कर यांची ह्रदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. याचदरम्यान, मोठा उद्योगपती आणि मार्गदर्शक शंतनूराव किर्लोस्कर यांची शरद पवारांनी भेट घेतली. या भेटीबद्दल शरद पवार सांगतात की, मी किर्लोस्करांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी एक उदाहरण देत मला नेमकं काय झालयं, याबाबत सांगितलं होतं. मोटारसारयकलच्या कार्बोरेटरमध्ये कचरा अडकल्यास काय होतं याबाबत शरद पवारांना किर्लोस्करांनी विचारलं, त्यावर शरद पवार म्हणाले, गाडीला धक्के बसतात. त्यावर कचरा काढावा लागतो, त्यामुळेच पायी चालणं चालू असून गाडी जोरात सुरु असल्याचं किर्लोस्करांनी सांगितल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.

‘पापाचा घडा लपवण्यासाठी योजनांचं पांघरून…’; लाडकी बहिण योजनेवरून ठाकरेंचा हल्लाबोल

त्या काळात शरद पवार यांनाही तोंडाचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांचे दहा-बारा दातं काढण्यात आले होते. शरद पवारांचा आहारही बदलला होता. फक्त लिक्विड स्वरुपात आहार घेऊ शकत होते, अपघातही झाल्याने त्यांच्या पायाला आर्टिफिशीयल बोन बसवण्यात आला होता. या अपघातात दोन्ही बरगड्या सुजल्या असल्याचं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं आहे.

सागरिका म्युझिकची यशस्वी 25 वर्ष पूर्ण’; ‘नानाछंद’ द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकार

दरम्यान, शंतनू किर्लोस्कर यांचं महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात मोठं असून एक मोठा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे पुण्यात असताना कधीतरी मोकळा वेळ मिळाल्यास आम्ही शंतनू किर्लोस्कर यांच्याकडे गप्पा मारण्यासाठी जात असायचो, याच भेटीमध्ये किर्लोस्कर यांनी आपल्या प्रकृतीबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी अमेरिकेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अमेरिकाला जाऊन शस्त्रक्रिया किर्लोस्कर पुन्हा ऑफिसला जायला लागले होते, असे आदर्श आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत असल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितलंय.

follow us