Download App

Video : प्रदेशाध्यक्षपदासाठी माझं नाव 2014 पासूनच चर्चेत पण…, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा मोठा खुलासा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लेट्सअप मराठीवर अनेक विषयांवर थेट भाष्य केलं आहे.

  • Written By: Last Updated:

NCP Sharad Pawar State President Shashikant Shinde : तुम्हाला प्रदेशाध्यक्षपदाची उशिरा संधी मिळाली असं वाटत का? असं विचारताच उशिरा नाही तर योग्यवेळी संधी मिळाली असं म्हणत अनेक विषयांवर थेट भाष्य करणारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मुलाख लेट्सअप मराठीवर झाली.  यामध्ये संपादक योगेश कुटे यांनी अनेक विषयांवर शिंदे यांना बोलत केलं आहे.

पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माझं नाव 2014 पासून चर्चेत होत. (Shinde) मात्र, पक्ष आणि नेतृत्व हा निर्णय घेत असतं त्यामुळं आत्ता जी संधी मिळाली ती योग्यवेळी मिळाली असं म्हणत नेतृत्वाचा विश्वास सार्थ करण्यासाठी अवघड परीक्षेचा पेपर सोडवायचा. तो पेपर सोडवण्यात यशस्वी झालो तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात असं म्हणत आता आपण लढणार आहोत असं शिंदे यावेली म्हणाले. तसंच, त्यांनी यावेळी राजकारणावर भाष्य केलं आहे.

Video :प्रदेशाध्यक्ष होताच शशिकांत शिंदेंना आर आर आबांची आठवण; म्हणाले, मी त्यांच्याप्रमाणेच लढणार अन्

आता राजकारणाची व्याख्या बदलली आहे. पूर्वी विचारांवर व्यक्तीवर राजकारण चालत होत. मात्र, आता त्यामध्ये बदल झाला असून सध्या जे काही राजकारण सुरू आहे ते सत्तेवर चालू आहे असं थट मत शिंदे यांनी यावेळी मांडलं आहे. सत्तेवर टीकण्यासाठी आणि राजकारणात हारण्यासाठी काय करावं लागेल अशी भूमिका सर्व पक्ष आता मांडायला लागले आहेत. त्याचबरोबर शिंदे यांनी निवडणुकांबाबत निर्माण झालेल्या अविश्वासावरही भाष्य केलं आहे.

आज देशभरात ईव्हीएम मिशिनबद्दल लोकांना शंका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरी यात्रेला जो प्रतिसाद मिळतोय त्यावरू लक्षाय येतय की लोकांच्या मनात काय चाललय. आज अनेक कार्यकर्ते म्हणतात ईव्हीएम मशिन असेल तर आम्हला निवडणुकच लढायची नाही. ज्या देशात लोकशाची पाळेमुळे रुजले आहेत त्या देशात अशी अवस्था असेल तर कसं होणार अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Tags

follow us