NCP’s mayor wins 10 out of 17 seats in Pune : नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी अजून सुरू असून आतापर्यंत झालेल्या मोजणीत पुणे जिल्ह्यातील अजित पवारांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादीचे 17 पैकी 10 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला(Shivsena) 4 जागा मिळाल्या असून भाजपला फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. पुणे(Pune) जिल्हा हा पवारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि आज नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून ते स्पष्ट देखील झालं आहे. लोणावळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे यांना नगराध्यक्षपदी संधी मिळाली आहे. दौंडमध्ये दुर्गादेवी जगदाळे, शिरूरमध्ये ऐश्वर्या पाचर्णे, इंदापूरात भरत शाह, जेजुरीत जयदीप बारभाई, भोरमध्ये रामचंद्र आवारे, बारामतीत सचिन सातव, फुरसुंगीमध्ये संतोष सरोदे आणि वडगाव मावळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या आंबोली ढोरे या विजयी झाल्या आहेत.
चाकणमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या मनीषा गोरे, जुन्नरमधून सुजाता काजळे, राजगुरूनगरमधून मंगेश गुंडा तर मंचरमधून राजश्री गांजले या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. सासवडमधून भाजपकडून निवडणूक लढवलेल्या आनंदी जगताप, आळंदी येथून प्रशांत कुराडे, तळेगावमधून संतोष दाभाडे यांनी विजय खेचून आणला आहे. माळेगाव नगरपंचायतीत जयश्री तावरे या अपक्ष महिला उमेदवाराचा विजय झाला आहे.
तर सासवड येथे भाजपच्या आनंदी काकी जगताप, आळंदी येथे प्रशांत कुराडे व तळेगावात संतोष दाभाडे यांचा विजय झाला आहे. माळेगाव नगरपंचायतीत जयश्री तावरे या अपक्ष महिला आमदाराचा विजय झाला आहे.
या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा त्यांची ताकद दाखवून दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पुण्यातला हा निकाल निर्णायक ठरणार आहे. नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कुठे कमकुवत नाही हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिलं आहे.
