Eknath Shinde : बैठक NDA ची पण चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेची…

एकीकडे कर्नाटकातील बंगळुरुमध्ये भाजपविरोधातल्या सर्वच पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आल्याचं दिसून आलं. तर दुसरकीडे नवी दिल्लीत एनडीए सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंहगर्जना केली आहे. राहुल व सोनिया […]

NDA Meeting

NDA Meeting

एकीकडे कर्नाटकातील बंगळुरुमध्ये भाजपविरोधातल्या सर्वच पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आल्याचं दिसून आलं. तर दुसरकीडे नवी दिल्लीत एनडीए सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंहगर्जना केली आहे.

राहुल व सोनिया गांधींचे विमान तातडीने भोपाळला उतरविले

या बैठकीमध्ये सर्वच राज्यातल्या घटक पक्षांच्या नेत्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली होती. बैठकीत भाषणात एकनाथ शिंदेंनी एनडीए देशात 350 पेक्षा अधिक तर राज्यात 45 पेक्षा अधिका जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या घोषणेला सूर लावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी निवडणुका लढवणार असल्याचं म्हणत 45 जागा निवडून आणणार असल्याचा शब्दच दिला आहे.

आव्हाडांनी थेट सोमय्यांचीच बाजू घेतली; ‘व्यक्तीगत हल्ले करून एखाद्याला…’

दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत देशभरातल्या एकूण 38 पक्षातील नेत्यांचा सहभाग होता. तर बंगळुरुमधल्या विरोधकांच्या बैठकीत 26 पक्षांचे नेते उपस्थित होते. एकीकडे विरोधकांकडून टीका तर दिल्लीतल्या एनडीएच्या बैठकीत एकनाथ शिंदेसह अजित पवार यांची छाप पडल्याचं दिसून आलं आहे. बैठकीत शिंदेंसह पवारांना महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. बैठकीत एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामध्ये बसलेले होते. तर अमित शहा यांच्या बाजूला अजित पवारांना स्थान देण्यात आले होते.

विरोधकांनी बैठकीनंतर केलेल्या टीकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात मोदींनी एनडीएचा फूल फॉर्मही सांगितला. ते म्हणाले की एन फॉर न्यू इंडिया, डी फॉर डेव्हलप्ड नेशन, ए फॉर एस्पिरेशन ऑफ पीपल ऑफ इंडिया.

Exit mobile version