‘राजीनामा नको, मोदी, शाहांना बदलून टाकणार’; भर पावसात आंबेडकर मुंबईच्या रस्त्यावर, राज्यात कडकडीत बंद

दिल्लीत घडलेल्या हिंसाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Vanchit

Vanchit

Neet Paper Leak Vanchit Protest : राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या (Delhi Voilence) घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज राज्यभरात बंद पुकारला. या बंदला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून मुंबई, पुणे, सोलापूर, अहिल्यानगरमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं. आता आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नकोयं, तर मोदी शाहांनाच बदलून टाकणार असल्याचा थेट इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी संयुक्त आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्विकारुन आपला राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह देशभरातील विरोधकांनी संसद भवनावर मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर अमानुषपणे अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ मुंबई, पुणे, अहिल्यानगर, सोलापुर, नांदेड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

मोदी, शाहांना बदलल्याशिवाय राहणार नाही – आंबेडकर

दडपशाहीच्या काळात दिल्लीत विद्यार्थी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते. देशातील 21 मुलांनी नीट पेपरफुटीमुळे जीव गमावला आहे. नीट पेपर लिक प्रकरण आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. पोलिसांत भरती नसलेले लोकं सिव्हील ड्रेसवर काठी घेऊन मारतात. ही क्रूर घटना असून लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम आहे. मोदी, शाहांना धर्मेंद्र प्रधानांवर प्रेम असेल तर तुमच्या घरात ठेवा, आता आम्हाला प्रधान यांचा राजीनामा नकोयं आता आम्ही मोदी शाहांना बदलल्याशिवाय राहणार नाही, असं सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटत असून आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे संसदेत कॉंग्रेसने आधी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मगच नीटच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नीटच्या मुद्द्यावर सुरु असलेलं विद्यार्थ्यांचं हे आंदोलन शमणार की पेटणार? हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version