Download App

धक्कादायक! लातूरमध्ये ‘NEET’ परीक्षेत दहा विद्यार्थ्यांना दिले गुण वाढवून, ‘CBI’ तपासात झालं उघड

नीट पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे लातूर जिल्ह्यात सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षकांना अटकही झाली आहे. आता नवीन माहिती समोर आली आहे.

Neet Paper Leak Scam : देशभरात नीट पेपर लीक प्रकरण गाजत आहे. (Neet Paper) पेपर फुटीचं प्रकरण हे एकाच राज्यात नाही तर पूर्ण देशभरात झालं आहे. दरम्यान, या प्रकाराचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यातही मराठवाड्याच्या लातूरला विद्येची नगरी म्हटलं जातं, तिथं सीबीआयची टीम तपास करत आहे. (Paper Leak) यामध्ये तब्बल १० विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sunil Kedar यांना दिलासा नाहीच; शिक्षेस स्थगिती अन् आमदारकीसाठीची याचिका खंडपीठाने फेटाळली

नीट परीक्षेत 10 विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याची माहिती सीबीआय चौकशीत समोर आली असून, सीबीआयचे अधिकारी लातूरात नीट परीक्षेच्या चौकशीसाठी ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे नीट बरोबर इतर स्पर्धा परीक्षांचे देखील प्रवेश पत्र अधिकाऱ्यांना तपासामध्ये आढळले आहेत. दरम्यान, नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमध्ये चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये दोन आरोपी सध्या सीबीआयच्या अटकेत आहेत. तर, इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

अटकेत असलेल्या दोन आरोपींच्या मोबाईलमधून आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत गुणवाढ करुन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर, हे 10 विद्यार्थी कोण आहेत याचा मात्र खुलासा आणखी झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आणि बिहार राज्यातील संशयास्पद परीक्षा केंद्राचा नेमका काय संबंध आहे? याचा तपास आता सीबीआय अधिक वेगाने करत असल्याची माहिती आहे.

‘तो’ व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला

दरम्यान, ८ जुलै रोजी एकूण २६ याचिकांवर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’, ‘आयुष’ तसंच, इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातात. सध्या अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या तिघांचं यामध्ये काय कनेक्शन आहे, याची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.

follow us