मोठी बातमी : NEET-PG 2024 परीक्षा पुढे ढकलणार नाही; ‘सुप्रीम’ निर्णय देत SC ने क्लिअर सांगितलं
Supreme Court refuses to pause NEET-PG exam scheduled for Sunday 11 August : नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशातील वातावरण ढवळून निघालेले असताना सुप्रीम कोर्टाने विद्यार्थांना मोठा धक्का दिला आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी होणारी NEET-PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत कोर्टाने करिअर धोक्यात घालू शकत नाही असेही स्पष्ट सांगितले.
#BREAKING #SupremeCourt refuses to postpone NEET-PG 2024 exam scheduled on August 11, dismisses a petition seeking postponement of the exam.
— Live Law (@LiveLawIndia) August 9, 2024
काय होती याचिका?
येत्या 11 ऑगस्ट रोजी होणारी परिक्षा (NEET Exam) पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांच्या शहरांबाबत 31 जुलै रोजी माहिती देण्यात आली होती. तर, परीक्षा केंद्राची माहिती 8 ऑगस्ट रोजी देण्यात आली होती. ही परीक्षा 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. एवढ्या कमी वेळात विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचणे अवघड असल्याने 11 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने काही विद्यार्थांच्या गैरसोयीसाठी लाखो विद्यार्थांचे करिअर धोक्यात टाकू शकत नसल्याचे सांगत ही याचिका फोटाळून लावली आहे. यापूर्वी NEET UG परीक्षा 23 जून रोजी होणार होती. मात्र, काही स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
बिग बींचं नाव घेतलं तरीही का चिडतात जया बच्चन? जाणून घ्या, राज्यसभेत काय घडतंय…
NBEMS ने 11 ऑगस्ट रोजी NEET PG परीक्षा 2 शिफ्टमध्ये घेण्याची घोषणा केली आहे. जेव्हा परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये घेतली जाते, तेव्हा मूल्यमापनासाठी सामान्यीकरण सूत्र स्वीकारले जाते. तथापि, बोर्डाने आतापर्यंत जारी केलेल्या कोणत्याही अधिसूचनेत सामान्यीकरण फॉर्म्युलाची माहिती दिलेली नाही. याबाबत उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उमेदवारांच्या एका बॅचला दुसऱ्या बॅचच्या तुलनेत अवघड प्रश्नपत्रिकेला सामोरे जावे लागू शकते आणि परीक्षा घेण्यापूर्वी सामान्यीकरण फॉर्म्युला कळवावा जेणेकरून मनमानी होण्याची शक्यता नाही असे याचिकेत म्हटले होते. याशिवाय परीक्षा केंद्राची माहिती 8 ऑगस्ट रोजी देण्यात आली होती. ही परीक्षा 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. एवढ्या कमी वेळात विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचणे अवघड असल्याने 11 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकवाली अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.