Download App

…तरीही महाअधिवेशन होणारच, नाना पटोलेंनी ठणकावून सांगितलं

मुंबई : काँग्रसेच्या महाअधिवेशनात अडथळे आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अधिवेशन होणारच, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावूनच सांगितलं आहे.

पटोले म्हणाले, काँग्रेसचं रायपूर इथलं महाअधिवेशन सुरुळीत पार पडू द्यायचे नाही, असा चंग बांधूनच सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नाहक त्रास दिला जात आहे.

रायपूरमधील काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले, त्यात त्यांना काहीच मिळाले नाही. आज दिल्लीहून काँग्रेसचे अनेक नेते रायपूरला अधिवेशनासाठी जात असताना राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर विमानातून खाली उतवल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

Devendra Fadanvis : शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार

तसेच काँग्रेस नेत्यांनी विरोध करत घोषणाबाजी केली. त्यानंतर आसाम पोलिसांची तक्रार असल्याचे सांगत पवन खेडा यांना अटक केली. मोदी सरकारची ही कृती अत्यंत निषेधार्ह व लोकशाही मुल्ये पायदळी तुडवणारी असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

‘त्यांच्या हातात सत्ता होती म्हणून ते बाहेर पडले’, Bala Nandgaonkar यांचा शिंदे गटाला टोला

भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली असून काँग्रेसला देशभरातून जनतेचा मोठा पठिंबा मिळत असल्यानेच मोदी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना रायपूरला जाण्यापासून रोखत अटक केली. याचा निषेध व्यक्त करत केंद्रातील मोदी सरकारवर नाना पटोलेंनी तोफ डागली.

Prashant Damale : मराठी रंगभूमीसाठी भाग्याचा दिवस, प्रशांत दामलेंना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवले असून हुकूमशाही कारभार सुरु आहे. तसेच मोदी सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून विरोधी पक्षांना दडपशाहीच्या मार्गाने संपवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अशा कारवायांना भीक घालत नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.

दरम्यान, एकेकाळी जगातील बलाढ्य शक्ती असलेल्या जुलमी ब्रिटिशांना काँग्रेसने देश सोडण्यास भाग पाडले. हे मोदी सरकारने लक्षात ठेवावे, मोदी सरकारची कृती हूकूमशाही प्रवृत्तीचीच असून या प्रवृत्तीचा मुकाबला काँग्रेस पक्ष करणार असल्याचा इशाराच नाना पटोलेंनी विरोधकांना दिला आहे.

Tags

follow us