New SIT team formed : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आला आहे. तसेच न्यायालयीन चौकशीसोबतच एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. मात्र, या एसआयटी (SIT) समितीवर देशमुख कुटुंबियांना आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
UGC NET Postponed: 15 जानेवारीला होणारी UGC- NET परीक्षा रद्द, ‘हे’ आहे कारण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्त केलेल्या एसआयटीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. या अधिकाऱ्यांपैकी काहींचे वाल्मिकी कराडशी संबंध असल्याचा आरोप देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला होता. यानंतर, एसआयटीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या एसआयटीमध्ये संभाजीनगरचे राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सुभाष मुठे, अक्षयकुमार ठिकणे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार यांची नव्याने नियुक्ती केली आहे. तर उपअधीक्षक अनिल गुजर हे देखील नवीन एसआयटीमध्ये असणार आहेत.
जपानमध्ये त्सुनामीचा इशारा 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपामुळे जमीन हादरली
आधी नेमलेल्या एसआयटीमध्ये विजयसिंह जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज राजेंद्र वाघ, चंद्रकांत एस. काळकुटे, बाळासाहेब देविदास अहंकारे, संतोष भगवानराव गित्ते या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता.
सुरेश धस यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
सुरेश धस यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, मी सातत्याने लावून धरलेल्या मुद्यान्वये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात SIT समिती गठित करण्यात आली होती. मात्र या समितीत बऱ्याच चुकीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. हा मुद्दा मी सतत लावून धरल्यानंतर या समितीत सदर प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी होण्याकरता आवश्यक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची निवड करून, SIT मध्ये सुधारणा केल्याबद्दल राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद.
या सुधारित समितीतील सदस्यांच्या चांगल्या कार्यक्षमतेमुळे या प्रकरणाचा तपास वेगाने आणि पारदर्शकतेने होईल; ज्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे शक्य होईल. हा निर्णय केवळ या प्रकरणाशी संबंधित नाही, तर इतर अनेक प्रकरणांच्या योग्य तपासासाठी दिशादर्शक ठरेल, असं धस म्हणाले.
विष्णू चाटेला १४ दिवसांचा कोठडी…
दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विष्णू चाटेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.