मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असतानाच नवा उदय होणार होता असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकतो. चांगली ऑफर मिळत असेल तर, सावंत भाजपशी घरोबा करू शकतात असे अंधारेंनी म्हटले आहे. एवढेच काय तर, उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही डग्ग्यावर हात मारून आहेत, संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहेत असे म्हणत राऊतांसह अंधारे आणि वड्डेटीवारांनी राजकीय भूकंपाचे एकप्रकारे संकेतच दिले आहेत. मात्र, विरोधकांचे हे दावे उदय सामंत (Uday Samant) यांनी साफ खोटे असल्याचे म्हणत खोडून काढले आहेत.
जिल्ह्याच्या पालकत्व मलिदा खाण्यासाठी की जिल्ह्याच्या मालकीसाठी?, वडेट्टीवारंचा महायुतीवर घणाघात
काय म्हणाले राऊत?
काँग्रेसवाले उद्धव ठाकरे संपले आहेत अशी भाषा करतात तुम्ही कुठे आहात? शिवसेना संपली नाही आणि संपणार नाही. भाजपा-मोदी-शाह कोणालाही सोडत नाही, जे सख्खे आहेत त्यांनादेखील सोडत नाहीत, सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरु असते. उदय सामंत यांचे नाव घ्यावे ते त्यांना दावोसला घेऊन गेले आहेत. उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत अशी माझी माहिती आहेत, जेव्हा सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले. भाजपा सर्व गट फोडतील, फोडाफोडी हेच त्यांचे राजकारण असल्याचा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.
“पाया पडून अजितदादांना सांगितलं पहाटेची शपथ घेऊ नका पण..”, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
शिंदेंची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो असे संकेत देणारे विधान केले आहे. ते म्हणाले की. नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न शिंदेंकडून सुरू आहे. पण शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट असल्याचे म्हणत शिंदे यांची गरज संपली का? असा प्रश्नदेखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंना संपून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल, तो उदय कुठला असेल, शिवसेनेच्या बाबतीत त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही डग्ग्यावर हात मारून आहेत, संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सामंतांनी खोडून काढले सर्व दावे
एकीकडे वडेट्टीवार, राऊत आणि अंधारेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरूवात झालेली असतानाच दुसरीकडे उदय सामंत यांनी विरोधकांचे सर्व दावे खोडून काढले आहे. शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलिकडचे असून, मी नेहमी राजकीय एथिक्स पाळतो. त्यामुळे मी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. राऊतांनी केलेलं वक्तव्य हे राजकीय बालिशपणाचे असून, राऊत आणि वडेट्टीवारांनी केलेले विधान हे धातांत खोटे असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.