दीपक केसरकर म्हणाले, उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की…आजी-माजी मंत्र्यांमध्ये जुंपली

  • Written By: Published:
दीपक केसरकर म्हणाले, उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की…आजी-माजी मंत्र्यांमध्ये जुंपली

Deepak Kesarkar On Uday Samant : कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असताना नारायण राणे यांचे हे विधान खूप महत्त्वाचे आहे. (Deepak Kesarkar ) शिवाय नारायण राणे यांनी बारसु रिफायनरी ऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे याला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते असल्याचे दिसून येत आहे.

…तर दोन महिन्यांतच आमचं मंत्रिपद जाणार; नाराज नेत्यांवरून उदय सामंतांची प्रतिक्रिया

नाणार ग्रीन रिफायनरी वरून कोकणातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसून आले. कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार असं एकीकडे खासदार नारायण राणे म्हणत असताना दुसरीकडे माजीमंत्री आणि आमदार दिपक केसरकर यांनी ही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का? हे तपासून पाहाव लागेल अस वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीवरून या दोन नेत्यांमधील मतभिन्नता समोर आली आहे. तर रिफायनरीच्या मुद्यावरून दिपक केसरकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावला आहे. उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पुर्ण जगभराची माहीती आहे, असा टोला दिपक केसरकर यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

साईबाबा समर्थ

चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आला आहे. मात्र, रामटेक बंगल्यात जे जे राहीले ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले असल्याचे सांगत शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील नीलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मी यापेक्षाही मोठ्या पदावर जाईन असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो, मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन, मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत . त्यामुळे जी मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आनंदात आहे, असं मत दीपक केसरकरांनी व्यक्त केलं आहे.

रिफायनहीबाबत काय म्हणाले सामंत?

कंपनी यायला जर तायार असेल तर प्रयत्न करणार, असं नारायण राणे म्हणाले. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. चर्चा करून मार्ग सोडवू… नाणारवर लोकांनी निर्णय घ्यावा. 2019 च्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही, असं सांगितलं होत. पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असं पत्र त्यांनी केंद्राला लिहिलं होत. पण सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करणार, असं उदय सामंत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube