Deepak Kesarkar : ‘ज्यांची बाजू लंगडी, त्यांनाच भीती’; सूचक शब्दांत केसरकरांचा ठाकरेंना टोला

Deepak Kesarkar : ‘ज्यांची बाजू लंगडी, त्यांनाच भीती’; सूचक शब्दांत केसरकरांचा ठाकरेंना टोला

Deepak Kesarkar on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. आज या प्रकरणात नार्वेकर निकाल देणार आहेत. आमदार पात्र राहणार की अपात्र (MLA Disqualification) होणार हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजच्या या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणात निकाल राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल दिवसभर हाच मुद्दा लावून धरला होता त्यामुळे राज्य सरकारही बॅकफूटवर होते. आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी याच मुद्द्यावर विरोधकांना सुनावले आहे. विरोधकांनी खोटी सहानुभूती मिळवणे बंद करावे, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

MLA Disqualification : आमदार पात्र की अपात्र? ठाकरे अन् शिंदेंसाठी आजचा दिवस महत्वाचा

केसरकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रश्न विचारला. त्यावेळी केसरकर म्हणाले, दोघांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले असे मानण्याचे कारण काय. आपली बाजू लंगडी आहे असे त्यांना वाटत म्हणून मतप्रदर्शन करून खोटी सहानुभूती मिळवण्याचे काम बंद करावे, अशा शब्दांत केसरकर यांनी विरोधकांना सुनावले.

विधानसभा अध्यक्षांवर अशा पद्धतीने आरोप करणे चुकीचे आहे. त्यांनी कोणतीही लपवाछपवी केलेली नाही. ज्यांची बाजू लंगडी असते त्यांनाच भीती वाटत असते. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना कोणत्याच पक्षात विलीन होण्याची गरज नाही. ठाकरे गटाचे अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहेत, असा टोला केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Rahul Narvekar : मी अशा दबावाला बळी पडत नाही, नार्वेकरांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

दरम्यान, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आज दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. यासंदर्भात मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेते काल वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube