मोठी बातमी! नाशिकमधील ‘TCS’ प्रकरणात निदा खानचा अटकपूर्व जामीन फोटाळला

अटकपूर्व जामीनासाठीचा निकाल राखून ठेवला होता. आज नाशिकरोड न्यायालय अंतरिम अटकपूर्व जामिनपूर्व अटक फेटाळला आहे.

News Photo   2026 05 02T184807.262

News Photo 2026 05 02T184807.262

नाशिकमधील टीसीएससारख्या नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिचा अजकपूर्व जामीन अर्ज अखेर फेटाळला आहे. त्यामुळे निदा खान हिला कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी पक्ष आणि तपास अधिकाऱ्यांनी मांडलेल्या मांडलेल्या मुद्द्यांनंतर नाशिकरोड न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीनासाठीचा निकाल राखून ठेवला होता. आज नाशिकरोड न्यायालय अंतरिम अटकपूर्व जामिनपूर्व अटक फेटाळला आहे.

नाशिक TCS प्रकरण – धार्मिक सक्ती, मानसिक छळ आणि ‘पत्नीला पाठवण्याच्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ

नाशिकमधील धर्मांतर रॅकेटची ‘मास्टरमाइंड’ निदा खान असून ती सध्या गरोदर असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात निदा खान फरार असून नाशिक पोलिसांनी तिच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. मात्र, सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने निदा खान आणि तिच्या साथीदारांविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाचे पुरावे सादर केले होते. त्यानंतर अखेर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के जी जोशी यांनी निदा खानचा अटक पूर्व जामीन फेटाळला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी युक्तिवादात अनेक धक्कादायक गोष्टी कोर्टासमोर मांडल्या होत्या.

निदा खान आणि इतर आरोपींनी पीडीत महिलेस धर्म परिवर्तन करण्यासाठी बुरखा दिला होता. तसेच मोहम्मद पैगंबर यांचे मुस्लीम धर्माची माहिती असलेले पुस्तक दिले होते.

अर्जदार आरोपी ही पिडीतेला पाठवत असलेल्या धार्मिक शिकवण देण्या-या युटयूब लिंक, इन्टाग्राम लिंक, रिल्स तसेच व्हिडीओ तिला कुठून मिळाल्या याबाबत तपास बाकी.

निदा खान वेळोवेळी पीडित महिलेला धार्मिक शिकवण देत होती आणि फिर्यादी घरी घेऊन जात आणि तिच्यीकडून नमाज पठण करणे, हिजाब व बुरखा कसा परिधान करणे हे शिकवत होती.

निदा खान आणि इतर आरोपी यांनी सदरचा गुन्हा संगणमत करून केलेला असुन यातील आरोपी दानिश शेख यांने फिर्यादीचे शैक्षणिक व इतर महत्वाचे कागदपत्र ताब्यात घेवून मालेगाव पार्टीकडून तिच्या नावात बदल करणार होते याकरता अर्जदार आरोपीकडून मालेगांव पार्टी बाबत तपास करणे आहे.

Exit mobile version