Neelam Gorhe : राणे कायद्याचे अभ्यासक आहेत का? दंगलीच्या आरोपांवर गोऱ्हेंचा सवाल

Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe ) या गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये सामील झाल्या आहेत. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचाारला असता. त्यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. Sanjay Raut : […]

NIlam Gorhe

NIlam Gorhe

Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe ) या गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये सामील झाल्या आहेत. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचाारला असता. त्यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut : ‘नार्वेकर कायदा मानत नाही, त्यांचं स्वतःचं पर्सनल लॉ’; राऊतांचा खोचक टोला

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

नीलम गोऱ्हे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपाला नीलम गोऱ्हे यांनी उत्तर दिल आहे. नीलम गोऱ्हे म्हणल्या की, जो खटला सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे, त्यावर कोणी भाष्य करीत असेल तर मला त्याबद्दल बोलायचं नाही. त्या व्यक्तीचे काय साधारण ज्ञान काय आहे? ते कायद्याचे अभ्यासक आहेत का? ते पोलीस डिपार्मेंटचे आहेत का? या वरून आपण ठरवत असतो. असं म्हणत त्यांनी राणेंच्या आरोपांवर उत्तर देणे टाळत त्यांच्यावर टीका देखील केले आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

मीरा बोरवणकर यांनी सांगितलं आहे. की, पुण्यामध्ये जी दंगल झाली होती. त्याचे नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकरांच्या विरोधातील सर्व पुरावे आमच्याकडे होते. मात्र आमच्यावर दबाव होता. तर राणे पुढे म्हणाले की, आमचा आरोप हा गोऱ्हे यांच्यावर नाही. तो उद्धव ठाकरेंवर आहे. कारण उद्धव ठाकरे राज्यात दंगली घडवत आहेत. तेव्हा तुमच्या माध्यमातून ठाकरेंनी दंगल घडवली.

ललित पाटीलला पुण्यात ‘एन्काऊंटरची’ भीती; न्यायालयात पोलिसांवर मोठा आरोप

तर आता तुम्ही ठाकरेंसोबत नाहीत शिंदेंसोबत सुरक्षित आहात. तेव्हा नार्वेकर हे ठाकरेंचे पीए होते. तेव्हा गोऱ्हे या ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करत होत्या. त्यामुळे नार्वेकर आणि गोऱ्हे यांचा नाही तर ठाकरेंचा या दंगली घडवण्यामागे हात होता. असा आरोप नितेश राणे यांनी केला. त्यावर गोऱ्हे यांनी त्तर देणे टाळत त्यांच्यावर टीका देखील केले आहे.

Exit mobile version