Sambhaji Patil Nilangekar : पूर्वीच्या काळात 25 एकर 50 एकर शेती असणारे शेतकरी होते. सध्या दोन ते तीन एकर शेती असणारे शेतकरी आहेत. त्यामुळे एकत्रीत येऊन शेती करावी लागणार आहे. तसंच, माझं सर्वांना सांगण आहे की शेती विकून नका. कारण आज आपल्याकडं हक्क काय आहे तर ती शेती आहे. (Sambhaji Patil) त्यामुळे कितीही अडचण आली तर शेती विकण्याचा विचार करू नका असं आवाहन निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. ते लेट्सअप मराठीवर मुलाखतीतत बोलत होते.
सध्या शेतीमध्ये तंत्रज्ञान आलं आहे. त्याचा वापर करण महत्वाचं असणार आहे. त्याबरोबर मोठ्या प्रमाणात वातावरण बदलत आहे. त्याच्यावर लक्ष ठेऊन शेतकऱ्यांनी काम करणं फार महत्वाचं आहे. तसंच, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडणार आहोत असंही निलंगेकर यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर शेतीमध्ये उत्पन्नात वाढ होण्यासाठी ज्या काही आवश्यक सुविधा लागतील त्या पुरवण्याचं कामही आपण सरकारच्या माध्यमातून करणार आहोत असंही ते म्हणाले आहेत. शेती विकायची नाही ती राखायची असंही निलंगेकर यावेळी म्हणाले आहेत.
निलंगा तालुक्यासह लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध; संभाजी पाटील निलंगेकरांचा मतदारांशी संवाद
यावेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिव्यांगांवरही भाष्य केलं आहे. दिव्यांगांसाठी आम्ही शासकीय पातळीवर काम करतो. कारण काही लोकांनी त्यांच्या नावाखाली फक्त राजकारण केलं आहे. परंतु, महत्वाचा लाभ त्यांना देता आला नाही असंही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आम्ही आमच्या तालुक्यात जिल्ह्यात किती दिव्यांग लोक आहेत याची खात्री करतो. त्यानंतर ज्या गोष्टींची त्या व्यक्तीला आवश्यकता आहे त्या गोष्टीची त्याचं ठिकाणी पुर्तता करणं अशी काम आम्ही केली आहेत असंही निलंगेकर यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी निलंगेकर यांनी सर्वात आवडत ठिकाण कुठलं विचारलं असताना मला सुट्टी असताना किंवा कुठ फिरायचं असेल तर मी पहिलं जातो ते तिरुपती बालाजीला. कारण येथे मला जाण्यासाठी खास आवडत. त्याचबरोबर सर्वांनी निलंग्यालाही यावं असंही ते म्हणाले आहेत. तसंच, माझ्या शाळेतील आवडते मित्र मी भेटतो. लातूर येथे मी मित्रांना भेटतो त्यांच्याशी चर्चा करतो असंही निलंगेकर यावेळी म्हणाले आहेत. कुठलाही मित्र असा नाही ज्याच्याशी माझा संवाद होत नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांना आवडीचं खाण विचालं असताना त्यांना निलंगा राईस आवडतो असंही ते म्हणाले आहेत.