निलंगा तालुक्यासह लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध; संभाजी पाटील निलंगेकरांचा मतदारांशी संवाद
Sambhaji Patil Nilangekar Campaign Sabha : लातूर शहर विधानसभेच्या भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. अर्चना ताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचार्थ लातूर येथील हनुमान चौकात भव्य प्रचारसभा पार पडली. (Sambhaji Patil) यावेळी लातूरच्या विकासाला लागलेले ग्रहण कायमचे हटवून शहराला प्रगतीचा नवा प्रकाश देण्यासाठी सर्वांनी अर्चनाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन निलंग्याचे भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सर्वांना केले.
लातूरने कायम देशाला एक नवा विचार दिला आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विचारांची लातूर ही जननी राहिली आहे. तरी देखील इथले लोक विकासापासून वंचित राहिलेले आहेत. आज २०२४ मध्ये देखील पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिकांना संघर्ष करावा लागतोय, हे किती मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन स्वार्थी लोकांना हाकलून आपला विचार करणाऱ्या लोकांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडण्याची वेळ आलेली आहे असंही ते यावेळी म्हणाले.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाचा गळित हंगाम सुरू, संभाजी पाटील निलंगेकरांची उपस्थिती
त्यामुळे येत्या २० तारखेला सर्वांनी विकासाचे निशाण खांद्यावर घेऊन कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून अर्चनाताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, अशी सादही त्यांनी सर्वांना घातली. दरम्यान, संभाजी पाटील निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रेचा आजच्या प्रसन्न आणि उत्साहवर्धक शुभारंभ शिवपुर येथून झाला. ग्रामस्थांनी पुष्प वर्षावासह केलेले स्वागत, ग्रामदेवतेचे दर्शन आणि गुरुवर्य पू. गोरक्षनाथजी महाराज औसेकर यांच्या शुभाशीर्वादाने आजचा सार्थकी लागल्याची प्रसन्न भावना मनामध्ये उत्पन्न झाली असं संभाजी पाटील म्हणाले.
यावेळी गावफेरी संपन्न करून गावातील सर्व नागरिकांचे आशीर्वाद घेतला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी केलेल्या औक्षणाचा स्वीकरून त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. तसेच सर्व नागरिकांशी संवाद साधताना विकासाच्या मुद्द्यावरच आपण या निवडणुकीला सामोरे जात असून आपली संपूर्ण कारकीर्द ही ‘सब का साथ, सब का विकास’ याच तत्वावर चालत आली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी व मतदारसंघाला विकासाच्या एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी येत्या २० तारखेला आपण सर्वांनी आपले भरभरून आशीर्वाद देऊन कमळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही संभाजी पाटील यांनी यावेली केलं.