Download App

संपूर्ण मराठवाड्यातील जात प्रमाणपत्र अन् पडताळणीचा प्रश्न निकाली काढणार -संभाजी पाटील निलंगेकर

निलंगा मतदारसंघासाठी आपण हा विषय सोडवला आहे. संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी

  • Written By: Last Updated:

Sambhaji Patil Nilangekar : काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात मराठवाड्यातील (Sambhaji Patil ) आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अन्यायकारक भूमिका घेतली. त्यामुळे हा समाज अडचणीत सापडला असून, निलंगा मतदारसंघात आपण हा प्रश्न निकाली काढला आहे. याच धर्तीवर महायुतीचे सरकार संपूर्ण मराठवाड्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न निकाली काढेल, असा विश्वास माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. बंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

वंजारी समाज माझ्यासोबत, पंकजा मुंडेंनी राजळेंचा प्रचार केला तरीही फरक पडणार नाही…; हर्षदा काकडेंना विश्वास

आधुनिक तंत्रज्ञानाने जिल्ह्यात सिंचन क्षेत्रात मोठं कामं करणार; आमदार राणाजगजितसिंह पाटलांचा विश्वास

निलंगा मतदारसंघासाठी आपण हा विषय सोडवला आहे. संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचं सरकार सक्षम आहे आणि आपले सरकारहा प्रश्न मार्गी लावेल, असं आश्वासनही निलंगेकर पाटील यांनी दिलं आहे. ज्यांनी सत्तेसाठी समाजावर अन्याय केला त्यांचेच पार्सल आपल्या मतदारसंघात पाठवण्यात आलं आहे. ते परत पाठवून काँग्रेसला धडा शिकवा, असं आवाहन निलंगेकर यांनी या मेळाव्यात केलं. याशिवाय बंजारा समाजाच्या विकासाच्या अनुशेष भरून काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचं निलंगेकर म्हणाले.

निलंग्यासह इतर मतदारसंघातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून मी पाठपुरावा करेन. याप्रकरणी शासनाचा आदेश काढून देण्यासाठी मी बांधिल असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं. मराठवाडा अध्यक्ष चंद्रहंस नलमले यांनी जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध आंदोलनं केली. केवळ निलंगेकर यांच्यातच हा प्रश्न सोडविण्याची धमक आहे. त्यामुळे समाजाने त्यांच्या मागे पाठबळ उभं करावे, असं आवाहन त्यांनी केलं.

follow us