Download App

दरमहा 27 कोटी रुपयांची हप्ते वसुली, लंकेंकडून पोलिसांचे रेट कार्ड जाहीर

Nilesh lanke : अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh lanke) गेल्या तीन दिवसांपासून अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील

  • Written By: Last Updated:

Nilesh lanke : अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh lanke) गेल्या तीन दिवसांपासून अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (Ahmednagar Local Crime Investigation) भ्रष्टाचाराविरोधात जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आज पत्रकारांशी बोलताना खासदार लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा 27 कोटी 60 लाख रुपयांचे हप्ते वसूल करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. याच बरोबर त्यांनी पोलीस वसूल करीत असलेल्या हप्त्यांचे रेटकार्ड देखील जाहीर केले आहे.

पत्रकारांशी बोलताना निलेश लंके म्हणाले, नगर पोलीस दलातील दोन टक्के अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण पोलीस दलाला बदनाम करत आहे. आज समाज भयभीत झाला आहे. जिल्ह्यात खुनाचा तपास का लागत नाही? अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालते? नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर आपल्या विभागात करू घेतात असं यावेळी लंके म्हणाले.

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करत आहे. आजच या विभागाच्या चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आताही पोलीस विभागाला आणखी पुरावे हवे आहे का? असा सवाल देखील यावेळी खासदार निलेश लंके यांनी उपस्थित केला.

मोठ्या प्रमाणात पोलिसांविरोधात भ्रष्टचाराचे तक्रारी आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर 22 जुलैपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. भ्रष्टचाराचे आरोप होत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबित कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.

निलेश लंके यांच्याकडून पोलीसांचे रेट कार्ड जाहीर

चंदन तस्करी, रेशनिंग – 40 लाख

हिरा, विमल गुटखा – 1 कोटी 28 लाख

आरएमडी गुटखा – 25 लाख

नगर शहर कॅफे – 50 लाख

वाळू ट्रॅक्टर – 2 कोटी 50 लाख

वाळू गाडी – 4 कोटी 80 लाख

जेसीबी – 1 कोटी 40 लाख

पोकलेन – 50 लाख

आयपीएल सट्टा – 50 लाख

वेश्या व्यवसाय हॉटेल – 30 लाख

इतर अवैध व्यवसाय – 55 लाख

मटका – 7 कोटी 55 लाख

बिंगो – 1 कोटी 40 लाख

मावा – 3 कोटी 30 लाख

दारू हॉटेल – 75 लाख

डिझेल, पेट्रोल तस्करी – 12 लाख 50 हजार

ट्रक रिक्षा – 10 लाख

बाजारात Jio Bharat J1 ची एंट्री, मिळणार UPI आणि लाइव्ह टीव्हीसह खूपकाही, किंमत फक्त …

जुगार – 75 लाख

follow us