Download App

Nitesh Rane : नारायण राणेंनंतर नितेश राणेंनीही काढला जरांगेचा अभ्यास; म्हणाले, त्यांना राष्ट्रवादीचा ‘तो’ पदाधिकारी…

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी देखील नारायण राणे यांच्याप्रमाणेच जरांगे यांच्या अभ्यास कमी आहे. असं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी जरांगे यांना राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी पाठिंबा देत आहेत. त्यांना सरकार विरूद्ध भडकवत असल्याचं म्हटलं आहे. नितेश राणे हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Salaar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासच्या ॲक्शन सीन्सने ‘सालार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

त्यांना राष्ट्रवादीच ‘तो’ पदाधिकारी…

पत्रकारांनी राणेंना जरांगेच्या अटकेवर प्रश्न विचारला तेव्हा राणे म्हणाले की, जसं नारायण राणे म्हणाले की, जरांगे हे तरूण आहेत. त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना जे काही राजरकीय पदाधिकारी त्यांच्या अवती-भोवती आहेत. जे त्यांना भाषण लिहून देत आहेत. त्यांच्या सभेचं नियोजन करत आहेत. ज्या प्रमाणे बीडच्या जाळपोळीमध्ये एक जण पडकला गेला. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी नगरमध्ये एक प्रदिप साळुंके म्हणून आहेत. ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. त्यांनी शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून तिकीट मागितलं होतं. त्यामुळे जरांगे यांच्या सभा आणि प्रदिप साळुंखे यांचं कनेक्शन समोर आणावं लागेल.

Ole Aale: नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर अन् सायली संजीव यांचा ‘ओले आले’ सिनेमाचा टीझर रिलीज

काय म्हणाले होते नारायण राणे?

नारायण राणे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण हवं की नाही हे मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला विचारावं. कोणताही मराठा बांधव ओबीसीतून आरक्षण घेणार नाही. आरक्षण कसं दिलं जात, आरक्षणाबाबत राज्यघटनेत काय तरतुदी आहेत, हे जरांगेंनी जाणून घ्याव्यात, तुम्ही अजून लहान आहेत, जरा अभ्यास करा, असं नारायण राणे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणावर नारायण राणे बोलताना माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या सवालावर राणए चांगलेच भडकल्याचे दिसून आले आहेत. कोण जरांगे पाटील? मला माहीत नाही, मी ओळखतंही नाही. तुम्ही त्याचं नाव सतत घेता? घटनेच्या कोणत्या कलमानूसार मराठा आरक्षण दिलं जाव, हे मनोज जरांगे पाटलांना विचारा, असंही खोचक विधान नारायण राणे यांनी केलं होतं.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादंग पेटलेलं असताना दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही कंबर कसण्यात आली आहे. जालन्यात ओबीसी मेळावा घेत मंत्री छगन भुजबळांनी मराठा बांधवांवर जोरदार प्रहार केल्याचं पाहायला मिळालं आहे. एवढंच नाहीतर मनोज जरांगे यांच्या हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे आता राज्यात मराठा-ओबीसी समाजबांधव एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरही नारायण राणे यांनी परखडपणे भाष्य केलं आहे. कोणत्याही नेत्याने दोन समाजात झुंज लावण्याचा प्रयत्न करू नये, असं नारायणे राणेंनी स्पष्ट केलं होतं.

Tags

follow us