Narayan Rane : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोय, जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा; राणेंनी डिवचलं

Narayan Rane : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोय, जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा; राणेंनी डिवचलं

Narayan Rane : आज केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रियाा दिली. तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर प्रश्न विचारला. त्यावेळी राणे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.

काय म्हणाले नारायण राणे?

यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देताना राणे म्हणाले की,मराठा आणि कुणबी यांच्यात फरक आहे. जरांगेंना तो माहित नसेल तर त्यांनी जातिंचा आभ्यास करावा. घटनेचा आभ्यास कारावा. कुठल्याही जातिला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम पाहा. तसेच जरांगे म्हणतात की, मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं. मात्र त्याची काही गरज नाही.

Jhalak Dikhhla Jaa 11: ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी होणार ‘हे’ स्पर्धक

मी मराठा आहे. मी कधीही असं कुणबीचं प्रमाणपत्र घेणार नाही. तसेच कोणताही मराठा असं कुणबीचं प्रमाणपत्र घेणार नाही. कारण शहण्णव कुळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. कुणबी मराठा वेगळा आहे. मराठा वेगळा आहे. त्यामुळे कोणताही मराठा असं सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र घेणार नाही. असं म्हणत नारायण राणे यांनी जरांगेंची मागणी फेटाळुण लावली आहे. तसेच जरांगेंना जातिंचा आभ्यास करावा. घटनेचा आभ्यास कारावा. असा सल्ला देखील दिला आहे.

IND Vs BAN : चाहत्यांची धाकधूक वाढली; हार्दिक पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात हलवले

दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी विरूद्ध विरोधक आणि जरांगे असं चित्र निर्माण झालं आहे. त्यात राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांच्या वक्तव्याने जरांगे भडकल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यात आता केंद्रिय मंत्री नारायण राणे हे देखील आता जरांगेंना थेट बोलले आहेत. जेव्हा राणे देखील स्वतः मराठा आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube