Download App

Nitin Gadkari : कसबा निवडणुकीनंतर नितीन गडकरींच्या नावाने ‘तो’ मेसेज करणारा निघाला ठाकरे गटाचा कार्यकर्ता

  • Written By: Last Updated:

पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये (kasba bypoll) भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या निकालानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. अखेरीस य प्रकरणी यवतमाळमधून एकाव्यक्तीला ताब्यात घेतलं. हा व्यक्ती ठाकरे गटाचा हा तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आलं आहे.

हेही वाचा : ठाकरेंना सीएमपद सांभाळता आले नाही, ते पीएम पद काय सांभाळतील?; रामदास आठवलेंचा खोचक टोला

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला गमावला तर दुसरीकडे नितीन गडकरींच्या नावाने एक मेसेज व्हायरल झाला. या संबंधात नितीन गडकरी यांनी नागपूर पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ठाकरे गटाच्या (शिवसेना) तालुकाध्यक्षाला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले होते, चार तासांच्या चौकशीनंतर सूचना पत्र देऊन त्याला सोडण्यात आले.

 

प्रवीण देशमुख असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव असून तो कंत्राटदार असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी तपास करत असताना पोलिसांनी एका व्हॉट्सअप ग्रुपचे चौकशी केली होती. त्याचा एडमिन असलेला प्रवीणला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. प्रवीणने संबंधित व्हॉट्सअप ग्रुपवर गडकरी यांच्या विषयी आक्षेपार्य मेसेज पोस्ट केला होता. यामागे आणखी कोणी आहे का या दृष्टीने देखील सायबर पोलीस तपास करत आहे.

काय होता मेसेज ?

व्हायरल पोस्टमध्ये नितीन गडकरी यांच्या फोटो व नावासह विधान केलेले आहे की, “पुणे जिल्ह्यातील कसबामध्ये झालेली निवडणूक ही भाजपसाठी आत्मचिंतन करण्याची वेळ. खरंच देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन चुक तर नाही केली ना? जनता कोणासोबत ही झालेला विश्वासघात खपवून घेत नाही.”https://www.youtube.com/watch?v=L_MEmbKD06M

Tags

follow us