Download App

22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते म्हणून…, इथेनॉलच्या आरोपावर नितीन गडकरींची भूमिका स्पष्ट

Nitin Gadkari On Ethanol Allegations : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

  • Written By: Last Updated:

Nitin Gadkari On Ethanol Allegations : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. त्यांच्यावर पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याबाबत आरोप करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणात नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तर आता या आरोपांवर नितीन गडकरी स्पष्टच बोलले आहे. माझ्या निर्णयामुळे नाराज झालेली एक शक्तिशाली आयात ‘लॉबी’ हे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे असं नितीन गडकरी म्हणाले.

नागपूर (Nagpur) येथे एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, माझ्या या निर्णयामुळे नाराज झालेली एक शक्तीशाली आयात लॉबी हे आरोप करुन माझी बदनामी करण्याचा (Ethanol Allegations) प्रयत्न करत आहे. कच्च्या तेलाच्या आयातीमुळे जवळपास 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. या निर्णयामुळे काही लोकांच्या व्यवसायांना फटका बसला आहे. त्यामुळे ते रागाने माझी बदनामी करत आहे. मी आजवर कुठल्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही. त्यामुळे ठेकेदार माझ्यापासून घाबरतात असं  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले.

या कार्यक्रमात पुढे बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी अशा टीकेला उत्तर देत नाही कारण असे केल्याने बातम्या बनतात. लोक फळ असलेल्या झाडावर दगड फेकतात. याकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे असं देखील यावेळी नितीन गडकरी म्हणाले. तर त्यांचे धोरण इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे आणि प्रदूषण कमी करणे यावर केंद्रीत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे इंधन आयातीत निहित हितसंबंध असलेल्यांना थेट नुकसान झाले असल्याचा दावा देखील नागपूर येथे बोलताना त्यांनी केला.

तसेच कच्च्या तेलाच्या आयातीतून देशातून सुमारे 22 लाख कोटी रुपये बाहेर जात होते. माझ्या या निर्णयामुळे काही लोकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि ते रागाने माझ्याविरुद्ध बातम्या प्रसारित करण्यासाठी पैसे देऊ लागले असं देखील मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

सावध राहा, पुढील 24 तासात ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी

follow us