77-foot statue of Lord Shri Rama entered in Winner’s Book of World Records: स्थापित केलेली आहे. ही कांस्य धातूची जगातील सर्वात उंच राममूर्ती आहे. जी मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी बनवली आहे. नुकतेच २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचे अनावरण झाले आहे.
मठाच्या 550 व्या स्थापना दिनानिमित्त ही भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे संस्थापक अध्यक्ष व 184 विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठाचे मठाधिपती परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामीजी व मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास डेम्पो यांना प्रदान करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री व सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत उपस्थित होते. (77-foot statue of Lord Shri Rama entered in Winner’s Book of World Records)
