राजयोगाच्या प्रचार व प्रसारसाठी ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरकेंचा गौरव; रशियामध्ये ग्लोबल लिडर अवॅार्ड प्रदान

राजयोगाच्या प्रचार व प्रसारसाठी  ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरकेंचा गौरव; रशियामध्ये ग्लोबल लिडर अवॅार्ड प्रदान

Brahma Kumar Dr. Deepak Harke honored for promoting and spreading Raja Yoga; Global Leader Award presented in Russia : रशियातील सेंट पिट्सबर्गमध्ये सिटीटेल हॅाटेलमध्ये आयोजित केलेल्या ग्लोबल ईकॅानॅामिक फोरम समिटमध्ये जगभरात १४३ देशात ८५०० हून अधिक सेवाकेंद्राच्या माध्यमातून निशुल्क ध्यानधारणा शिकविणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांचा जगभरात भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सेंट पिटर्सबर्ग रिट्रिट सेंटरच्या डायरेक्टर बी के संतोष दीदी व मिस रशिया वालेरिया मिर यांच्या हस्ते ग्लोबल लिडर अवॅार्ड ने सन्मान करण्यात आला. यावेळी ब्रिक्स चे सदस्य उद्योजक अॅन्ड्रयू चिरवा उपस्थित होते.

या घटनेत कुठंही जाती-धर्माचा संबंध नाही; शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट, काय म्हणाले?

ब्रह्माकुमार डॉ दीपक हरके हे १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय आहेत. तसेच त्यांनी विविध विश्वविक्रम हे भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार करण्यासाठी केले आहेत.यापूर्वी ही ब्रह्माकुमार डॉ दीपक हरके यांना देशात व परदेशात विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांना लंडन मध्ये विविध ८ पुरस्कार मिळाले आहेत, यामध्ये ब्रिटिश पार्लियामेंट व ऑक्सफर्ड विद्यालयात त्यांना विशेष सन्मानित करण्यात आलेले आहे.

ईशान खट्टर म्हणजे जेन झीचा मिलिंद सोमन; अत्यंत मिळत्या-जुळत्या आहेत ‘या’ गोष्टी

लंडन बरोबरच त्यांना दुबई मध्ये विविध ५ पुरस्कारांनी, बँकॉक येथे ३ पुरस्कारांनी, नेपाळ येथे २ पुरस्कारांनी तसेच स्वित्झर्लंड, मलेशिया व श्रीलंकेमध्ये ही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल मार्च २०२० मध्ये विश्वविख्यात फोर्ब्स मासिकाने घेतली आहे. बी के डॉ दीपक हरके हे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना या संस्थेच्या संपर्कात आले व नंतर त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केले.आता ते पूर्णवेळ ध्यानधारणेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य जगभरात करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube