अहमदनगर शहरातील महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम…

अहमदनगर : अहमदनगर शहरातील विश्वभारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाने महान संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवले. संत गाडगे बाबा यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाजसुधारणा केली. त्यांच्याच या महान कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांनी या विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा उपक्रम राबवला. Narayana Murthy : मूनलाइटिंग, वर्क फ्रॉम होमच्या जाळ्यात अडकू नका, तरुणांना सल्ला […]

Untitled Design   2023 02 24T182807.903

Untitled Design 2023 02 24T182807.903

अहमदनगर : अहमदनगर शहरातील विश्वभारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाने महान संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवले. संत गाडगे बाबा यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाजसुधारणा केली. त्यांच्याच या महान कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांनी या विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा उपक्रम राबवला.

Narayana Murthy : मूनलाइटिंग, वर्क फ्रॉम होमच्या जाळ्यात अडकू नका, तरुणांना सल्ला

त्यानंतर विद्यार्थ्यांना संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे अमूल्य विचार योगदान याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर यामध्ये प्राध्यापक मोरे, प्राध्यापक बोबडे आणि प्राध्यापक बांगर याचा सक्रीय सहभाग होता.

विश्वभारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या या उपक्रमाला शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नगरसेवक प्रशांत गायकवाड आणि सहकारी सतीश खैरे, आणि पालिकेचे अधिकारी भालेराव यांनी उस्फुर्त सहभाग घेवून विद्यार्थ्यांच्या कार्यास हातभर लावला. प्रशांत गायकवाड यांनी कॉलेजचे आणि विद्यार्थी मुलांचे कौतुक केले. तर खैरे यांनी मुलांसाठी खाऊचे वाटप केले.

Exit mobile version