माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार; पेटाची याचिका फेटाळून पेटावरच 25 हजारांचा दंड लावला!

Madhuri Elephant PETA Case माधुरी हत्तीणीला पुन्हा गुजरातमधील वनतारा प्रकल्पात पाठवण्याची मागणी आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Madhuri Elephant PETA Case

Madhuri Elephant PETA Case: कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला पुन्हा गुजरातमधील वनतारा प्रकल्पात पाठवण्याची मागणी आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणात पेटा इंडियाला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, ही रक्कम माधुरीच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली. त्यामुळे माधुरी हत्तीणीच्या नांदणीतील वास्तव्यासंदर्भातील वादात मठाची बाजू महत्त्वाची ठरली आहे.

माधुरीला पुन्हा वनतारामध्ये पाठवण्याची मागणी

माधुरी हत्तीणीला वनतारामधून नांदणी मठात परत आणल्यानंतर तिची योग्य देखभाल होत नसल्याचा दावा पेटा इंडियाने केला होता. तिला साखळदंडांनी बांधून एकाकी ठेवले जात असल्याचा आरोप करत पेटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. माधुरीला पुन्हा गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पात हलवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

‘अवघ्या दोन मिनिटांत नुकसान पाहणी; आमच्या नुकसानीचा अंदाज कसा येणार?’ केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा संताप

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पेटा इंडियाची याचिका फेटाळून लावली. तसेच पेटाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम माधुरीच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरण्याचे आदेश दिल्याचे नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी सांगितले.

निकालानंतर नांदणी गावात आनंदोत्सव

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मिळताच नांदणी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले. गावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसेच नागरिकांना साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

नानांच्या निधनाआधीचा ‘तो’ शेवटचा फोन; हेमा मालिनींनी सांगितली मनाला चटका लावणारी आठवण

माधुरी हत्तीणीच्या वास्तव्यासंदर्भातील हा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नांदणी मठातील माधुरीच्या देखभालीचा आणि वैद्यकीय उपचारांचा विषय पुन्हा महत्त्वाचा ठरणार आहे.

follow us