Nashik Accident : आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात (Nashik ) नाशिकमधील आडगावजवळ झाला असून त्यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Accident ) आयशरचालक विरुद्ध दिशेने येत असताना समोरून जाणाऱ्या ब्रेझा कारने समोरून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे कोंबड खत वाहतूक करणारी आयशर ट्रक काल रात्री उशीरा वेगात होती. याचवेळी ट्रकचा एक टायर फुटला अन चालकाचा ताबा सुटला. ट्रक (एम.एच.15 जीव्ही 9190) दुभाजकावर चढून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन धावत्या ब्रेझा कारवर (एम.एच 05 डीएच 9367) आदळला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले. ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले आहेत. दरम्यान, ट्रक चालकाने मद्य प्राशन केल्याचं समोर आलं आहे.
महायुती भक्कम! काँग्रेसची आठ मतं फुटल्याने ‘मविआ’ला तडे; जयंत पाटीलही पराभूत
रहेमान सुलेमान तांबोळी (४८) त्यांचा भाचा अरबाज चांदुभाई तांबोळी (२१, दोघे. रा.लेखनगर सिडको), सीज्जू पठाण (३८,रा.इंदिरानगर), अक्षय जाधव (२४,रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) या चौघांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहीती आडगाव पोलिसांनी दिली. भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळे जण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते. तेथून व्यवसाय आटोपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही घटना घडली.
आता क्रिकेटच्या मैदानात नाना पटोलेंची बॅटिंग, एमसीए निवडणूक लढणार
दोन दिवसांपूर्वी मालेगावमध्ये एक भीषण अपघात झाला. आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नात गंभीर जखमी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगामधील वाके हद्दीत हा अपघात झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.