Kalyani Nagar Accident : दोघांचा जीव घेणाऱ्या ‘लाडोबा’ने अखेर 300 शब्दांचा निबंध लिहिला!

  • Written By: Published:
Kalyani Nagar Accident : दोघांचा जीव घेणाऱ्या ‘लाडोबा’ने अखेर 300 शब्दांचा निबंध लिहिला!

पुणे : भरधाव वेगात पोर्श कार चालवत दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने अखेर दोन महिन्यांनी 300 शब्दांचा निबंध सादर केला आहे. अपघात घडल्यानंतर बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीस अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अजब शिक्षा सुनावत जामीन मंजूर केला होता. या शिक्षेवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवण्यात आली होती. (Kalyani Nagar Car Accident Teen Submit 300 Words Essay)

पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा; सभागृहात फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

प्रकरण काय

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलास बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला होता. तसेच 14 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याबरोबरच अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अजब शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या आदेशानंतर चहुबाजूकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदार मोहितेंच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं, एकाचा मृत्यू

बाल न्याय मंडळाचा हा निर्णय धक्कादायक होता अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी जामीनाबाबत फेरविचार याचिका दाखल केली होती. मंडळाने जामीनाच्या निर्णयाचा पुनर्विचार करत जामीन रद्द केला. तसेच या अपघाताचा संपूर्ण तपास होईपर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. या अपघात प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान ते ठरवले जाणार आहे. तोपर्यंत म्हणजेच 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते.

मतांच्या राजकारणापेक्षा घटनेची योग्य माहिती घ्या; पुणे अपघात प्रकरणी फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावलं

मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मजूंर 

19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात (Porsche Car Accident) आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन मुलाची आत्या पूजा जैन यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. तसेच कोर्टाने मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube