Download App

दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाकडून कट्टा हिसकावतांना आईलाच लागली गोळी

  • Written By: Last Updated:

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. आताही जळगावमध्ये पोटच्या मुलाने दारूच्या नशेत आईला बंदुकीच्या गोळी मारल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. कमलाबाई सोनवणे (Kamalabai Sonawane) असं जखमी महिलेचं नाव आहे. (Jalgain Crime)

world cup 2023 : रोहितने केली चाहत्यांची इच्छा पूर्ण; विराटने घेतली नऊ वर्षानंतर नववी विकेट

मिळालेल्या माहितीनुसार, गावठी पिस्तूल घेऊन दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाकडून पिस्तूल हिसकावताना कलाबाई प्रकाश सोनवणे (६०, रा. शिवाजीनगर) यांच्या हाताला गोळी लागली. ही घटना काल रात्री शिवाजी नगर येथे घडली. याप्रकरणी रोहित सोनवणे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात 12 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव महापालिकेतून आरोग्य सेविका म्हणून निवृत्त झालेल्या कलाबाई सोनवणे या जळगावमधील शिवाजीनगर परिसरात राहतात. त्या आपला पती, दोन मुले आणि दोन सूनांसह गेल्या अनेक वर्षापासून शिवाजीनगर परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा रोहित हा दारूच्या आहारी गेला. दारू पिऊन पैशांसाठी तो सातत्याने घरच्यांशी वाद घालायचा. घरच्यांना मारहाण करायचा. काल रात्री 9.30 च्या सुमारास रोहित दारूच्या तर्रर्र होऊन घरी आला. यावेळी त्यांच्या हातात गावठी कट्टा होता. रोहित नेहमीप्रमाणेचं वाद घालेल. ऐन दिवाळीत काही बरं-वाईट होऊ नये म्हणून कमलाबाई यांनी रोहितच्या हातातून कट्टा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित दारूच्या नशेत होता. त्याचा कमलाबाईंशी शाब्दीक वाद सुरू होता. रोहित कट्टा सोडायला तयार नव्हता. दोघांत चांगलीच झटापट झाली. या झटापटीत रोहितच्या कट्ट्यातून सुटलेली गोळी कमलाबाईच्या उवव्या हाताच्या मनगटाला लागली. यात त्यांचा हात गंभीर जखमी झाला.

गुंतवणूकदारांची दिवाळी! सेन्सेक्सची उसळी; निफ्टीही 19,500 पार, इन्फोसिसचे शेअर्सं दीड टक्क्यांनी वाढले 

आईच्या हाताला लागलेली गोळी पाहून रोहितने घटनास्थळावरून पोबारा केला. दरमयान, कमलाबाईंच्या हातातून रक्तस्त्राव होत असल्यानं त्यांच्या सुनेनं त्यांना खाजगी रुग्णालयात नेलं. तिथं हातावर शस्त्रक्रिया करून हातातली गोळी काढण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी कमलाबाई यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी रोहित सोनवणे विरुध्द गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

Tags

follow us