गुंतवणूकदारांची दिवाळी! सेन्सेक्सची उसळी; निफ्टीही 19,500 पार, इन्फोसिसचे शेअर्सं दीड टक्क्यांनी वाढले

  • Written By: Published:
गुंतवणूकदारांची दिवाळी! सेन्सेक्सची उसळी; निफ्टीही 19,500 पार, इन्फोसिसचे शेअर्सं दीड टक्क्यांनी वाढले

Muhurat Trading 2023: आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशांतर्गत शेअर बाजारात (stock market) जोरदार वाढ दिसून आली. एक तासाच्या व्यवहारानंतर शेअर बाजार 350 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला. BSE सेन्सेक्सने सुरुवातीला 500 हून अधिक अंकांची उसळी घेतली आणि नंतर BSE चा मुख्य निर्देशांक 65,418.98 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी देखील 19500 पार करून 19547.25 वर उघडला.

Diwali 2023 : दिवाळीत भाविकांकडून साईचरणी दान !आंध्रप्रदेशमधील भक्ताकडून मोठी रक्कम 

मुहूर्ताच्या व्यवहारात लहान आणि मध्यम समभागातही वाढ झाली. प्री-ओपनिंगमध्ये बाजाराने चांगली सुरुवात केली. बीएसई मिडकॅप 32,888 च्या जवळपास वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. तर मिडकॅप निर्देशांक 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 32.783.34 च्या पातळीवर बंद झाला.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. बीएसई ऑटो इंडेक्स 0.51 टक्के, रियल्टी इंडेक्स 0.59 टक्के, मेटल इंडेक्स 0.86 टक्के, आयटी इंडेक्स 0.96 टक्के, बीएसई एनर्जी इंडेक्स 0.85 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

प्रीतम मुंडेंना शह देण्यासाठी भाजपची खेळी? सुरेश कुटे बीड लोकसभा लढविणार असल्याची चर्चा 

प्री-ओपन सेशनपासून हिरवळ
NSE नुसार, मुहूर्त ट्रेडिंग 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 पर्यंत झाले. 6 ते 6.15 या वेळेत प्री-ओपनिंग झाले. यानंतर 6.15 ते 7.15 पर्यंत सर्वसामान्यांना व्यवहार करता आला. ब्लॉक डील विंडो फक्त 5.45 वाजता उघडली गेली. मुहूर्त ट्रेडिंगचे शेवटचे सत्र 7.25 ते 7.35 पर्यंत झाले. कॉल ऑक्शन इलिक्विड सेशन संध्याकाळी 6:20 ते 7:05 दरम्यान झाले. प्री-ओपन सत्रात बीएसई सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, तर निफ्टीने 19,580 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांच्या वाढीसह नव्या सत्राची सुरुवात केली. तर शुक्रवार सेन्सेक्स 64,904.68 अंकांवर बंद झाला होताय.

कोणत्या शेअर्समध्ये तेजीत ?
शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्समधील सर्व ३० कंपन्यांचाी हिरव्या चिन्हावर सुरूवात केली. या काळात लहान आणि मध्यम समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. टाटा मोटर्स, कोल इंडिया, यूपीएल, इन्फोसिस, ओएनजीसी यांचे समभाग वाढत राहिले, तर बँकिंग समभागही वधारले आणि गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत मोठा नफा मिळवला.

इन्फोसिसचे आयटी शेअर्स दीड टक्क्यांनी वाढले
मुहूर्ताच्या व्यवहारात गेल्या पाच वर्षांत सेन्सेक्स सातत्याने वाढला आहे. सेन्सेक्स हिरव्या चिन्हावर बंद झाला आहे दरम्यान, यावेळी बाजारपेठेतील सर्वच क्षेत्रात हिरवेगार वातावरण राहिले. तर व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 355 अंकांनी किंवा 0.55% वाढून 65,260 वर बंद झाला, तर निफ्टी 100 अंकांनी वाढून 19,525 वर बंद झाला. सेन्सेक्सवरील आजच्या विशेष सत्रात इन्फोसिसचे आयटी शेअर्स सुमारे दीड टक्क्यांनी वाढले, तर विप्रोचे शेअर्सही सुमारे एक टक्क्यांनी वधारले.

गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये मुहूर्ताच्या व्यवहारात सेन्सेक्स अवघ्या एका तासात 524 अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. तर 2021 मध्ये सेन्सेक्स 296 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube