Download App

अवैध धंद्यांचे शटर बंद ; नगर जिल्ह्याला हवाय खाडे पॅटर्न !

  • Written By: Last Updated:

DYSP Santosh Khade : अहिल्यानगर ( Ahilayangar) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकामध्ये एक नाव अत्यंत चर्चेत आहे ते म्हणजे संतोष खाडे (Santosh Khade) यांचे. आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे खाडे यांची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली आहे. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी गेल्या महिनाभरात नगर जिल्ह्यात एकामागून एक केलेल्या धडाकेबाज कारवाया चांगल्याच गाजल्यात. कधीकाळी ‘एलसीबी’त कार्यरत राहिलेल्या आणि आपल्या वतनात वेगळाच ‘धाक’ निर्माण करणार्‍या खाडे यांनी धडक कारवाया करीत अवैध व्यावसायिकांवर चांगलीच‘दहशत’निर्माण केलीय.


रेल्वे तिकीट मिळणार ईएमआयवर! रेल्वे विभागाचा मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कारवायांची जेवढी चर्चा झाली नाही, तेवढी चर्चा अवघ्या महिन्याभरामध्ये खाडे यांनी केलेल्या कारवायांची झाली. आर्थिक लागेबंधामुळे पोलीस प्रशासनाच्या तुटपुंजा कारवायांमुळे जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी वाढली. मात्र मात्र खाडे यांनी उचललेल्या आक्रमक कारवायांमुळे नगर जिल्ह्याला संतोष खाडेसारख्या दबंग पोलीस अधिकाऱ्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

ऊसतोड कामगारांचा मुलगा ते डीवायएसपी पदावरती पोहोचलेले संतोष खाडे यांचा संघर्षमय प्रवास सर्वांनाच माहिती आहे. नगर जिल्ह्यात अवैध व्यवसाय व ती धडाकेबाज कारवाई करत प्रचंड दहशत निर्माण करणारे खाडे यांचा चार महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी 19 जुलै रोजी पूर्ण झाला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक निरोप देखील त्यांना देण्यात आला. परीक्षावेक्षाधिन असलेले पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे आता पुढील प्रशिक्षणाकरता धुळे येथे गेले आहेत. मात्र नगर जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कारवायांमुळे पोलीस प्रशासनाचे काम कसे असावे याचा उत्तम उदाहरण खाडे यांनी जिल्हा दाखवून दिले.

धक्कादायक! चक्क पोलिसांनी आरोपीकडूनच घेतली दिड कोटींची खंडणी; गुन्हे शाखेचे चार कर्मचारी निलंबित

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांचे गुन्हेगार, अवैध धंदे चालविणाऱ्यांशी असलेले हितसंबंध पाहता या ठिकाणी पोलीस अधिकारी असो किंवा प्रशासकीय अधिकारी यांना काम करणे हे कठीणच जाते. गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. खून, दरोडे, अवैध व्यवसाय, बनावट दारू यामुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत होती. वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासनाला देखील अपयश येत असल्याचं वारंवार अधोरेखित होत होते. यातच नगर जिल्ह्यामध्ये वाढलेली व्यसनधीनता यामुळे गुन्हेगारी देखील वाढू लागली होती.

अवैध धंद्यांना आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाला देखील तारेवरची कसरत करावी लागते. अशा कठीण परिस्थितीमध्ये संतोष खाडे यांनी अवघ्या चार महिन्यांमध्ये आपले कर्तृत्व दाखवून दिले. जिल्ह्यातील सुगंधी तंबाखू, मावा उत्पादकांवरती, जुगार अड्ड्यांवरती, बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा बडगा उगारला. खाडे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध व्यवसाय चालकांचे देखील धाबे दणाणले. बहुतांश अवैध धंदे हे पोलीस खात्यातील काही अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे नगर जिल्ह्यात सर्रास सुरू होते. मात्र नगर जिल्ह्याला देखील खाडे यांच्यासारख्या दबंग अधिकाऱ्याची गरज आता जाणवू लागली आहे.

निडर खाडेंची अनोखी स्टाईल
गुन्हेगारांवर कारवायासाठी वेळेच्या चौकटीत संतोष खाडे अडकले नाहीत. संतोष खाडे हे रात्री-अपरात्री कायदा सुव्यवस्था अबाधित रावा यासाठी रस्त्यावर उतरत असत. कधी रुबाबदार पोलिसाच्या गणवेशात तर कधी वेशांतर करत खाडे यांनी अवैध धंद्यांना चपराक लावली. अनेकदा अवैध धंद्यांवरती राजकीय वरदहस्त असतो अशी चर्चा असते. यातच अनेक पोलिस अधिकारी देखील राजकीय नेत्यांना दुखवू नये यासाठी चिरीमिरी कारवाई करतात. मात्र खाडे यांनी कारवाई करताना कोणतीही तमा न बाळगता निडरपणे कारवाया केल्या. किंबहुना नागरिकांनाही त्यांचा हाच खाडे पॅटर्न कुठेतरी भावला असल्याचे चित्र सध्या नगरमध्ये दिसते.

पोलीस प्रशासनाला हप्ते खोरीची कीड

हप्तेखोरीची कीड पोलीस प्रशासनाला असल्यानेच नगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट होत असल्याचा देखील वारंवार नागरिकांकडून बोलले जाते. तंबाखूजन्य पदार्थ, मावा विक्री यावरती यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाकडून कारवाया करण्यात आल्या. मात्र या केवळ दिखाव्या पुरत्याच असतात. यामुळे या अवैध धंद्यांना आळा बसावण्यात अपयश पोलीस प्रशासनाला येत असतात. गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील आपले काम उत्तमरीत्या करावे अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जाते.

जिल्ह्यातील पोलीस पथकांची दिखाऊ कारवाई…

नगर जिल्ह्यात अवैध धंदे तसेच गुन्हेगारी याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. वारंवार पोलिसांना याबाबात नागरिकांकडून देखील निवेदन देण्यात येतात मात्र कारवाया बाजूलाच राहतात केवल आश्वसन देण्यात येते. जुगार, पट्ट्यांचे क्लब, अवैध दारू हे खुलेआम पणे जिल्ह्यात सुरु आहे मात्र पोलिसांकडून केवळ किरकोळ कारवाई करत दिखाऊ कारवाईचे प्रदर्शन केले जाते. आर्थिक तडजोडीतूनच हे सर्व अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊले उचलले जात नसल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे.

खासदारांचे आंदोलन…आश्वासन…अन चिडीचूप

काही दिवसांपूर्वी नगर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर नगरचे खासदार निलेश लंके यांनी आंदोलन केले होते. पोलीस प्रशासनावर आरोप करत अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांवर आरोप त्यांनी केले. त्यानंतर मिळालेल्या आश्वसनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र जिल्ह्यात अवैध धंदे असो किंवा तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरूच आहे. आंदोलनांमुळे लोकप्रतिनिधी देखील चर्चेत येतात मात्र आपण हाती घेतलेला प्रश्न मार्गी लागला की नाही याबाबत तेही गंभीर नसल्याचे यामाध्यमातून समोर येते. यामुळे नगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व अवैध धंद्यांना आळा बसवा यासाठी नगर जिल्ह्यात खाडे पॅटर्न राबविण्यात यावा अशी हाक नागरिकांकडून देण्यात येत आहे. खाडे यांनी केलेल्या या कारवायांमधून पोलीस प्रशासन काही सकारात्मक धडे घेणार का? की नगरची परिस्थिती आहे तीच राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

 

follow us