Download App

ठाकरेंना धक्का! अहिल्यानगरचे पदाधिकारी करणार जय महाराष्ट्र; मुहूर्तही ठरला

अहिल्यानगरमधील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Shivsena UBT : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता ठाकरे गटात इन्कमनिंग झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर आता त्याचे परिणाम थेट गावपातळीवर दिसून येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी ठाकरेंची मशाल खाली ठेवत थेट शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत आता राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. कार्यकर्ते व पदाधिकारी यांची समजूत काढण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांची नगरमध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आपले राजकीय अस्तित्व अबाधित राहावे यासाठी येत्या उद्या बुधवारी (29 जानेवारी) शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते हे पक्षाला उमेदवारी न मिळाल्याने चांगलेच नाराज झाले होते. याच नाराजीचा परिणाम आता दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तसेच जिल्ह्यातील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होतील अशी चर्चा नगरमध्ये चांगली रंगत होती. या वृत्ताला आता पुष्टी मिळाली असून ठाकरेंच्या सेनेला गळती सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी नगर शहरातील निष्ठावंत सैनिकांसह काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता.

उद्धव ठाकरेंची कोंडी! मनपा निवडणुकीआधीच मोठ्या नेत्याचा जय महाराष्ट्र; शिंदे गटात प्रवेश

अहिल्यानगर शहरातील या माजी नगरसेवकांच्या प्रवेशाने ठाकरे सेनेला चांगला धक्का बसला असून सेनेतील उर्वरित माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते हे देखील लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या सर्वांच्या प्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेत ठाकरेंच्या सेनेऐवजी एकनाथ शिंदेंच्या सेनेचा झेंडा महानगरपालिकेत फडकण्यासाठी रणनीती तयार होत आहे.

नाराजांच्या मानधरणीसाठी धावाधाव

अहिल्यानगर शहरातील बहुतांश नगरसेवक व पदाधिकारी, माजी नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे समजताच ठाकरे सेनेच्या वरिष्ठांना जाग आली आहे. संपूर्ण निवडणूक काळात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची दखल न घेणाऱ्या, भेट नाकारणाऱ्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी सुरू झाल्याचे समजते. यातच ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे पुण्याकडे जात असताना ते नगरमधील शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते. यावेळी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. मात्र नाराज सैनिक शिंदे गटाकडे जाणार असल्याच्या मतावर ठाम असल्याचे समजते आहे.

बाबा सिद्दीकींच्या डायरीत भाजप नेत्यासह ‘या’ बिल्डरांची नावं; कंबोज यांचाही खुलासा

follow us