अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) केडगाव (Kedgaon) परिसरात अल्पवयीन मुलाचं अपहरण आणि अनैसर्गिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. आरोपींनी काही दिवसांपूर्वी एका १६ वर्षीय मुलाचं आणि त्याच्या दोन मित्रांचं अपहरण केलं होतं. अपहरणानंतर आरोपींनी तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपींनी १६ वर्षीय मुलावर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला. या गंभीर प्रकरणातील आरोपींना कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) पथकाने अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी संबंधित आरोपींची धिंड काढली आहे.
सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, पण…; पहलगाम हल्ल्याबाबत पवार काय म्हणाले?
याबाबत अधिक माहिती अशी, केडगावमध्ये रावण नावाचा ग्रुप असून त्या ग्रुपमध्ये दहा ते पंधरा गुन्हेगारी विचारांचे तरुण आहेत. या ग्रुपकडून दमदाटी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. याच ग्रुपने एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी कोतवाली पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही धिंड काढण्यात आली असून नागरिकांच्या उपस्थितीत आरोपींना जनतेसमोर आणण्यात आले.
कुणी दहशत करत असेल तर तात्काळ संपर्क साधावा..
याबाबत अधिक माहिती देताना डीवायएसपी अमोल भारती म्हणाले की, या प्रकरणात एकूण १२ आरोपी आहेत. संबंधित आरोपींनी ‘रावण ग्रुप’ नावाचा एक ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातून ते संबंधित भागात दहशत पसरवत होते. यापैकी ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल. जर कोणी रावण ग्रुपच्या नावाखाली दहशत पसरवत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन भारती यांनी केले आहे.