अहिल्यानगर ( Ahilyanagar) जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) तालुक्यात वडील व मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. वडिलांनी अल्पवयीन मुलीवर गेली तीन वर्षे लैंगिक अत्याचार केलाय. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधम वडिलांवर शेवगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलीने ही घटना घरी सांगितली होती. बदनामी पोटी घरच्यांनी मुलीला शांत करून प्रकरण दाबले होते. परंतु मुलीने ओळखतील एका व्यक्तीला हे प्रकरण सांगितल्यानंतर त्याने मुलीला धीर देऊन पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दिली.
खचलेल्या पीडितेकडून टोकाचा निर्णय
पीडित अल्पवयीन मुलगी ही हिंगणगावमधील असून, शेवगावमध्ये (Shevgaon) अकरावीला शिकते. मुलगी आठवीला असल्यापासून वडिल तिचा लैंगिक छळ सुरू केला. मुलीने वडिल करत असलेल्या अत्याचाराची माहिती घरातील आई, आजी व इतरांना दिली होती. परंतु त्यांनी मुलीवर दबाव आणून तिलाच शांत केले. परंतु गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अत्याचारामुळे मुलीने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. गावातील एका व्यक्तीला हा प्रकार सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने व त्याच्या भावाने मुलीला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. पीडित मुलगी ही मामाच्या गावाला गेली होती. त्याचवेळी चुलत्याला ही घटना कळाली होती. परंतु चुलत्याने मुलीला मदत न करता तो तिला घरी घेऊन गेला होता.
क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाने पटकावले तब्बल 7 पुरस्कार, वाचा, कुणाला कोणता पुरस्कार?
गावातील काही लोकांच्या मदतीमुळे गुन्हा
घरी कोणीच मुलीला मदत करत नव्हते. फिर्याद देऊ नये म्हणून मुलीवर दबाव आणला होता. परंतु तिने ओळखीच्या काही जणांच्या मदतीने शेवगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद नोंदविली आहे.
मुलगी व पित्याच्या संभाषणाची क्लीप व्हायरल
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाषणाची एक क्लीप व्हायरल झाली आहे. त्यात मुलगी ही रडून पित्याला काही प्रश्न विचारत आहे. तुम्ही वडिल असताना माझ्याबरोबर असे कसे करू शकतात. मी कुणावर विश्वास ठेवावे, असे मुलगी म्हणते. तर वडिल ही माझी चूक झाल्याचे सांगत आहेत. ही क्लीपही पुरावा म्हणून पोलिसांकडे देण्यात आली आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी नराधम पिता हा फरार झाला आहे.