Shevgaon BJP Protest : ‘शेवगावमध्ये भाजपकडून राहुल गांधीच्या पुतळ्याचे दहन
अहमदनगर : शेवगावमध्ये आज क्रांती चौकामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने व ओबीसींच्या विरोधात अपमान जनक केल्यामुळे आज अहमदनगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवगावमध्ये राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत त्यांची शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये अंतयात्राही काढण्यात आली.
ताराभाऊ लोंढे, भिमराज भागडे, शिंदे सेनेचे आशुतोष डहाळे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा आशाताई गरड, अशोक गाडे, गणेश कोरडे, नितीन दहिवाळकर, दिगंबर काथवडे, अशोक ससाणे, अमोल घोलप,भुषण देशमुख, श्याम कनगरे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघाले असून राहुल गांधी यांनी मोदी (Modi) आडनावावरून विधान केल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकूणच राजकीय वातावरण तापले असून कालपासून देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मोदी आडनावावरून राहुल गांधी यांनी अवमान केल्याचा आरोप करत भाजप (BJP Protest) रस्त्यावर उतरली आहे. याचे पडसाद राज्यभरात दिसून येत असून भाजप महाराष्ट्राकडून आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेवगावमध्ये भाजपने देखील रस्त्यावर उतरत राहुल गांधी यांचा निषेध केला.
मनसेचा शिंदे-भाजपा सरकारला इशारा, ‘…अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू नका’
राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे प्रचंड जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. या रॅलीत त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.