मनसेचा शिंदे-भाजपा सरकारला इशारा, ‘…अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू नका’

मनसेचा शिंदे-भाजपा सरकारला इशारा, ‘…अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू नका’

पुणे : पुणे शहरामधील ऐतिहासिक पुण्यश्वर (punyashwar ) आणि नारायणेश्वर मंदिर (narayaneshwar temple) आहेत. पण या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण असून ते हटविण्यात यावे. या दोन्ही मंदिराचे उत्खनन करण्यात यावे. यातून सत्य परिस्थिती निश्चितच समोर येणार आहे. हे सर्व महिन्याभरात शिंदे- फडणवीस सरकारने (shinde bjp government ) करावे. अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू देऊ नका. असा इशारा मनसेचे (mns ) राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारला दिला आहे.

यावेळी अजय शिंदे म्हणाले की, पुणे शहराची ओळख असलेल्या पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण काढण्यात यावे. या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासुन लढा देत आहे. ते प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. पण अनेक दाखले आणि कागद पत्रातून मंदिर परिसरात झालेला अतिक्रमण स्पष्ट होत आहे. पण आजपर्यंत यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झाली नाही.

Post Account Scam : पुण्यात पोस्ट खात्यात कोट्यावधीचा घोटाळा; तीन पोस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

आम्ही गेल्या अडीच वर्षाच्या कालावधी असलेल्या राज्य सरकारकडे देखील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. पण त्या सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. उलट आम्ही दिलेल्या माहितीविषयी आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातून त्या सरकारची भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, गेल्या ८ महिन्याअगोदर शिंदे आणि फडणवीस यांच सरकार हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आले आहे. या सरकारकडून अनेक अशा अपेक्षा आहेत.

तसेच गुढीपाडवा सणाच्या दिवशी मुंबईत झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम येथील दर्ग्या विषयी मांडलेल्या भूमिकेच्यावर पुढील काही तासात तो दर्गा हटविण्यात आला. या कारवाईच आम्ही स्वागत करत असून आता पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचे उत्खनन करण्यात यावे. तसेच मंदिर परिसरात असलेले अतिक्रमण देखील हटविण्यात यावे, अशी आमची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याबाबत राज्य सरकारने महिन्याभरात कार्यवाही न केल्यास आम्हा मनसैनिकांना उत्खनन करण्याची वेळ आणू नका देऊ असा इशारा राज्य सरकारला देखील त्यांनी यावेळी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube