अहिल्यानगरचे सुपूत्र करणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र, लघु शस्रास्त्र निर्मिती; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

Ahilyanagar जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.

Ahilyanagar Ganesh Nibe

अहिल्यानगरचे सुपत्र करणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र, लघु शस्रास्त्र निर्मिती; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

Ahilyanagar Ganesh Nibe : आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले. “निबे स्पेस” असं या कंपनीचे नाव आहे. ज्यामध्ये देशाच्या संरक्षण साहित्य उत्पादन केले जाणार आहे.

सांगली हादरली! चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजाऱ्याचे अमानुष कृत्य

चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत नानेकरवाडी येथील निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन आणि स्थापना दिन सोहळा पार पडला.

अहिल्यानगरचे भूमिपुत्राच्या प्रकल्पाचं पुण्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे पहिले असे राज्य आहे की ज्याने काळाची पावले ओळखून २०१७ साली संरक्षण उत्पादन धोरण तयार केले. आज देशाचे खरे डिफेन्स क्लस्टर हे महाराष्ट्र आणि त्यातही ते पुण्यात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया- मेक फॉर वर्ल्ड’ ही घोषणा दिली आणि देशातील नवोन्मेषकांना संधी, व्यासपीठ मिळवून दिल्याने आज आपला देश संरक्षण क्षेत्रात श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करत आहे, असेही ते म्हणाले.

जबरदस्त, पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा 4 विकेट्सने धुव्वा, भारतीय संघाचा शानदार विजय!

विखे पाटील म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी मेक इन इंडियाचा जो संकल्प आणला आहे. तो पुढे नेण्याचे काम श्री. निबे करत आहेत. शिर्डी येथे नवीन औद्योगिक क्षेत्रात संरक्षण क्लस्टर उभे राहत असून त्यात पहिला प्रकल्प निबे समूहाचा येत आहेत. संरक्षण क्लस्टर सुरू करण्यातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करू शकल्यास या प्रकल्पाचा चालना मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

प्रास्ताविकात श्री. निबे यांनी आपल्या कंपनीविषयी माहिती दिली. कार्यक्रमात निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.चे डिआरडीओशी तंत्रज्ञान आदानप्रदान करार, प्रिमीअर एक्प्लोजिव्हस, महाराष्ट्र सरकारचे एमआरसॅक, थॅलेस ॲलेनिया स्पेस, ब्लॅक स्क्ाय या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी केली.

Exit mobile version