अहिल्यानगरचे भूमिपुत्राच्या प्रकल्पाचं पुण्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

1 / 9

अहिल्यानगरचे भूमिपुत्र देशाचे संरक्षण साहित्य बनवणार; पुण्यात प्रकल्पाचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

2 / 9

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र श्री गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.

3 / 9

"निबे स्पेस" असं या कंपनीचे नाव आहे. ज्यामध्ये देशाच्या संरक्षण साहित्य उत्पादन केले जाणार आहे.

4 / 9

पुणे येथे सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे आज उद्घाटन पार पडले.

5 / 9

या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री मा.उदय सामंत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

6 / 9

गणेश निबे यांनी यशस्वीपणे सुरू केलेल्या या उद्योगाच्या वाटचालीला शुभेच्छा देवून प्रवरा शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्याने साध्य केलेल्या कार्याचा अभिमान असल्याचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उल्लेख केला.

7 / 9

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निबे लिमिटेड' वर्धापन दिन व अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेची पाहणी केली.

8 / 9

दरम्यान आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला.

9 / 9

त्यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाषणं देखील केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube