अहिल्यानगर – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) अंतर्गत शहरी सन २०२४ च्या स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल जाहीर झाले आहेत. यात ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अहिल्यानगर (Ahilyanagar) शहराचा देशात पाचवा क्रमांक आला आहे. तर, राज्यात चौथा क्रमांक आला आहे. मात्र, शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहे, नालेसफाई झालेली नसताना हा पुरस्कार मिळालाच कसा, असा सवाल नागरिक करत आहे.
Pune Crime: कोंढव्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस; टपरी चालकावर हल्ला…
अहिल्यानगरचा स्वच्छता सर्वेक्षणात पाचवा क्रमांक आलाय. जलस्रोत, निवासी व मार्केट परिसर, शौचालयांची स्वच्छता आदींमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीत अव्वल गुणांकन देण्यात आले आहे. स्वच्छ शहरांमध्ये यंदाही थ्री स्टार मानांकन देण्यात आले आहे. मागील वर्षाअखेरीस झालेल्या सर्वेक्षणात शहरातील स्वच्छता गृहे, कचरा डेपोतील प्रक्रिया केंद्र, डम्पिंग साईट, शहरातील दैनंदिन साफसफाई, जलस्रोत आदींच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात आली असल्याचे महानगरपालिकेकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल; म्हणाले चौदाव्या वर्षी संजीव कुमारला दिला होता ऑटोग्राफ
दरम्यान, या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अहिल्यानगरचा देशात पाचवा आणि राज्यांमध्ये चौथा क्रमांक आला असला तरी अहिल्यानगर शहरातील नागरिक मात्र महापालिकेच्या सुविधांवर प्रचंड नाराज आणि संतापलेले दिसून आले आहेत. एकीकडे देशात पाचवा क्रमांक पटकावलेल्या शहरात अक्षरशः कचऱ्याचे ढीग, ओढ्यात जलपर्णी, कचरा, गाळ प्रचंड प्रमाणावर साचलेला दिसत आहे. यावर शहरातील नागरिकांनी पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशी उषा गवळी म्हणाल्या की, आमच्या भागात कचऱ्याची गाडीच येत नाही. त्यामुळे लोक आजूबाजूला कचरा टाकतात. मी घरपट्टी भरते, मग तरीही मनपाचे सफाई कामगार कचरा न्यायला का येत नाही?, असा सवाल त्यांनी केला.
हाडकोच्या समता चौकातील रहिवाशी दिलीप शेळके म्हणाले, आमच्या भागात महिन्याभरात एकदा गाडी येते. गाडी आली तरी थांबत नाही. मनपा आमच्याकडून कर वेळेवर वसूल करते, मग सफाईच्या बाबतीत एवढी दिरंगाई का? एवढी सगळा कचरा शहरात फडलेला दिसतो, तरीही स्वच्छता अभियानात पाचवा क्रमांक मिळालाच कसा, हे कळत नाही, असं ते म्हणाले.
अनिल चंगेडिया म्हणाले, आमच्या प्रभागात जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेत. पण, याकडे डोळेझाक करतेय. आयुक्त नालेसफाई झाली असं सांगतात. त्यांनी एकदा सिव्हिल हाडकोत येऊन पाहावं, नालेसफाई कशी झाली? त्यांना कळेल,असं ते म्हणाले.