नगरमध्ये लवकरच सरकारी मेडिकल कॉलेज, केंद्राकडून समिती नियुक्त; खा. लंकेंचा पाठपुरावा

नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करावे या खासदार नीलेश लंके यांच्या मागणीस यश आले आहे.

Nilesh Lanke (2)

Nilesh Lanke (2)

Ahilyanagar News : राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठ्या असलेल्या लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करावे या खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मागणीस यश आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने नगर जिल्ह्यात हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली असून या महाविद्यालयासाठी जागेचा शोध घेण्यासंदर्भात समितीस सूचना देण्यात आल्या आहेत. खासदार नीलेश लंके यांनी ही माहीती दिली.

खा. नीलेश लंके यांनी संसदेत क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नाही याकडे लक्ष वेधले होते. लंके यांच्या या मागणीची दखल घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा.डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. योगेश गवळी यांच्यासह जालना येथील शासकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. इब्राहिम अन्सारी यांचा समावेश आहे.

बेकायदेशीररित्या बुलडोझर चालवले, आता मलाही तुरूंगात डांबण्याचा कट.. निलेश लंकेचा आरोप

यासंदर्भात राज्य शासनाने पारीत केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे की नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी नगर जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात संसदेत मागणी केलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अहिल्यानगर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्या संलग्नीत ४३० खाटांचे रूग्णालय स्थापन करण्यासाठी सुचविण्यात आलेल्या तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सुयोग्य जागांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषांनुसार तपासणी करून जागेची निवड यासाठी ही समिती गठीत करण्यात येत आहे.

पहिल्याच अधिवेशनात वेधले होते लक्ष

अहिल्यानगर जिल्हा राज्यात विस्ताराने सर्वाधिक मोठा असतानाही या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. त्यामुळे सर्वसामान्य रूग्ण तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कुचंबना होते. या समस्येकडे नीलेश लंके यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. तसे पत्रही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा, वित्तमंत्री निर्मला सितारामन यांच्यासह केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान सिंह यांना दिले होते.

आरोग्यात जिल्हा मागासलेला

आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने नगर जिल्ह्याची स्थिती मागासलेली आहे. गोरगरीब जनतेसाठी स्वस्त आणि सुलभ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे गरजेचे असल्याचे सांगत खा. लंके यांनी या मागणीचा आग्रही पाठपुरावा केला होता.

नगर शहरानंतर विविध कार्यालयांचं नामांतर; पोस्ट ऑफीसचे नावही अहिल्यानगर केलं जाणार

 

Exit mobile version