Ahilyanagar News : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्ताने रविवारी (दि.१२) केडगाव येथे जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी दिली. जिजाऊ महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक किसन सातपुते यांची निवड करण्यात आली आहे.
१२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, लेखक नितीन थोरात, लेखक देवा झिंजाड, उद्योजक राजेंद्र शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे प्रसिद्धीप्रमुख सचिन चोभे यांनी सांगितले. रविवारी सकाळी ९.३० वाजता व्याख्यान सुरू होईल. शहरातील अधिकाधिक युवक, तरुण आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महादेव गवळी यांनी केले आहे.
अहिल्यानगरच्या मातीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’, 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणार स्पर्धा
या महोत्सवात अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याद्वारे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांचंही मार्गदर्शन युवकांना नेहमीच होत असतं. त्यांच्या कल्पकतेतून त्यांनी हिवरेबाजार गाव जगाच्या नकाशावर आणलं. त्यांचेही विचार या निमित्ताने ऐकण्याची संधी मिळणार आहे.
प्रख्यात लेखक नितीन थोरात यांना ऐकता येणारआहे. तसेच त्यांना भेटताही येणार आहे. संवेदनशील लेखक, जिल्ह्याचे सुपुत्र देवा झिंजाड यांनाही ऐकण्याची संधी यानिमित्ताने नगरकरांना उपलब्ध होणार आहे. इतरही सर्व दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरूणांसाठी विशेष संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे. शहर व उपनगरातील युवकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार; अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता