Ahilyanagar News : अनेकदा तक्रार करुनही प्रशासनाकडून सिद्धटेकच्या अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात न आल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत जागेवरील अतिक्रमणावर हातोडा चालवत जमीनदोस्त केलंय. कर्जत तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक मंदिराजवळ काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामानंतर येथील थडग्यावर एका समाजाकडून अनपेक्षित पूजापाठ सुरू झाल्याचे लक्षात येताच येथील ग्रामस्थांनी ही बाब हिंदुत्ववादी संघटना तसेच आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना व संग्राम जगताप यांच्याकडून संबंधित अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाला कळवले होते. मात्र, कुठलीही कारवाई झाली न झाल्याने आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत थडग्यावर हातोडा चालवलायं.
Video : मुंबई असुरक्षित म्हणणे चुकीचे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी असे अनधिकृत थडगे किंवा बांधकामे असतील ते प्रशासनाने कारवाई करून काढावे अन्यथा आम्ही ते काढू, असा थेट इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलायं. यावेळी हिंदू राष्ट्रचा नारा देत भाजपने यापूर्वीच अशा आतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आता नगर जिल्ह्यातही अशी आक्रमण वाढत असल्याच्या तक्रारी काही हिंदूत्ववादी संघटनांकडून केल्या जात आहेत. अशाच एका तक्रारीची दखल घेत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सिद्धटेक येथील या विवादित जागेवर हातोडा टाकला. तसेच नगर शहरात असलेल्या काही विवादित जागांवरील विशिष्ट समाजाकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर देखील अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी जगताप यांच्याकडून देण्यात आलायं.
अखेर गाझा युद्ध संपलं! लवकरच होणार युद्धविराम; वाचा इस्त्रायल-हमास युद्धाची टाइमलाइन
घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त…
सिद्धटेक येथे गणपती मंदिराबाहेर असलेल्या त्या विवादित जागेवरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील कोणताही त्रास होऊ नये याची देखील यावेळी दक्षता घेण्यात आली. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा जातीयतेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.