महायुतीचे संग्राम जगताप 14 हजार मतांनी आघाडीवर …नगरमध्ये कोणाची आघाडी अन् कोणाची पिछाडी?

महायुतीचे संग्राम जगताप 14 हजार मतांनी आघाडीवर …नगरमध्ये कोणाची आघाडी अन् कोणाची पिछाडी?

Assembly Election Result : विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election Result) मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून यामध्ये नगर शहरातून संग्राम जगताप यांनी चौथ्या फेरी अखेरीस 14,175 मतांनी आघाडी घेतलीयं. तर प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर हे पिछाडीवर आहे. तर राज्यात चर्चेत असलेल्या कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे आघाडीवर आहे तर राम शिंदे हे पिछाडीवर आहे. तसेच शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे आघाडीवर तर प्रभावी घोगरे व राजेंद्र पिपाडा पिछाडीवर आहे.

Assembly Election : हम सत्ता में रहना चुनेंगे! सत्तेच्या स्पीचवर प्रकाश आंबेडकरांनीही चेंडू टाकला…

तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेरसह शेवगाव पाथर्डी मतदारसंघाची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले 8569, भाजपच्या मोनिका राजळे 2080, तर महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे 534 हे पिछाडीवर आहे. शेवगाव मतदारसंघातून घुले आघाडीवर आहेत. महायुतीच्या मोनिका राजळे तर महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिर्डी मतदारसंघामध्ये पहिली फेरी पार पडली असून यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना 6992 , तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांना 3895 , तसेच राजेंद्र पिपाडा यांना 62 मते मिळाली आहेत.

नाशिक पश्चिममध्ये मतदान यंत्र अन् व्हीव्हीपॅटमध्ये बदल; ठाकरे गटाच्या नेत्याची निवडणूक आयोगात धाव

कोपरगाव मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस महायुतीचे आशुतोष काळे यांनी 8433 मतांनी आघाडी घेतली असून महाविकास आघाडीचे संदीप वर्पे यांना 1420 मते मिळाली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube