Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बस स्थानकात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीयं. पारनेरमधून मुंबईकडे जाणाऱ्या या बसचे ब्रेक फेल झाल्याने ही एसटी बस थेट बस स्थानकातच घुसलीयं. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पारनेर बस स्थानकाहून ही बस मुंबईकडे जाणार होती. बस सुरु झाल्यानंतर अचानक बसचे ब्रेक फेल झाले. ब्रेक फेल झाल्यानंतर थांबण्याऐवजी ही बस थेट बस स्थानकात घुसलीयं. यावेळी बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या दोन जणांना एसटीची जोराची धडक बसली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Ahilyanagar News : एसटी बसचे ब्रेक फेल; थेट बस स्थानकातच घुसली, दोन जण गंभीर…
पारनेर बस स्थानकावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट बस स्थानकात घुसली असून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Untitled Design