महायुती सरकारचा भव्य शपथविधी! उद्धव ठाकरेंसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री, बडे नेते अन् संत महंतांनाही निमंत्रण

महायुती सरकारचा भव्य शपथविधी! उद्धव ठाकरेंसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री, बडे नेते अन् संत महंतांनाही निमंत्रण

Maharashtra CM Oath Ceremony Uddhav Thackeray Invited : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत तर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री, असं जवळपास निश्चित झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी (Maharashtra CM) सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय.

आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केलं जाणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्व बड्या नेत्यांना प्रशासकिय निमंत्रण देण्यात आलंय. सर्व माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण दिलं जाणार आहे. त्याचसोबत केंद्रातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, मराठी कलाकार, मुंबई-महाराष्ट्रातील प्रमुख पदांवरील व्यक्ती, अंबानींसह सर्व बडे उद्योगपती, (Maharashtra Politics) सीए, डॉक्टर आणि सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठीत, 100 हून अधिक संत-महंत, बॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, 10 हजार लाडक्या बहि‍णींसह ‘जो राम को लाये है हम उनको लायेंगे’ या गाण्याचे गायक कन्हैय्या मित्तल उपस्थित राहणार आहेत.

अजितदादा दिल्लीला गेले पण का? शिंदेंचं टेन्शन वाढणार की आणखी काही..

अजय-अतुल, कैलास खेर यांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. तसेच 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहमार आहे. तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, रामदास आठवलेंसह महत्वाचे केंद्रातील पाच मंत्री शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळतेय.

विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी प्रचार करताना ‘एक है तो सेफ है’चा नारा’ दिला होता. हाच नारा आता पुन्हा महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात देखील दिसणार आहे. शपथविधी सोहळ्यात तब्बल दहा हजार भाजप कार्यकर्ते पुन्हा ‘एक है तो सेफ है’चा नारा’ दिसणार आहे. या आशयाचे टी शर्ट कार्यकर्ते परिधान करणार आहेत. त्यामुळे आता भाजप पुन्हा ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्याची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे.

Video : एकनाथ शिंदे काम करू शकणार का?; तपासणी केलेल्या डॉक्टरांनी दिलं महत्त्वाचं उत्तर!

शपथविधी सोहळ्याला नामदेव शास्त्री (भगवानगड), प्रसाद महाराज (अंमळनेरकर), नरेंद्र महाराज नानीद , राधानाथ स्वामी महाराज (इस्कॉन), गौरांगदास महाराज (इस्कॉन), जनार्दन हरीजी महाराज, महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज, जैन मुनी लोकेश या संत महंतांना देखील निमंत्रण धाडण्यात आलंय. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीन कुमार, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मु्ख्यमंत्री नायब सिंह सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube