Download App

पाहायला गेलो विक्रम दिसला वेताळ…; बाळासाहेब थोरातांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

Balasaheb Thorat On Pm Modi : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेत माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, जो भाजपच्या विरोधात जाईल त्याला लगेच ईडी लावायची. त्याचवेळी इस्त्रोचं यान विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरत होतं, त्यावेळी पंतप्रधान मोदींना स्क्रीनवर दाखवले जात होते, त्यावरुन आमदार थोरात म्हणाले की, लोकं असं म्हणत होते की, पाहायला गेलो विक्रम आणि दिसला वेताळ असे म्हणत कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर घणाघाती टीका केली.

मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवीचे नाव दिल्याने शरद पवार गडबडून गेले, पडळकरांचा हल्लाबोल

बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजप विरोधात कोणी बोलत असेल तर इनकम टॅक्स, ईडी, पोलीस चौकशी लावून विरोधकांचा आवाज दाबून टाकायचं काम सुरु आहे. त्याचवेळी आज संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण सुरु आहे. देशात दुसऱ्या एखाद्या मंत्र्याचं नाव सांगा म्हटलं तर सांगता येणार नाही, मलाही सांगता येणार नाही. दुसरं कोणीही नाही फक्त एकटाच कार्यक्रम सुरु आहे. असं म्हणत पंतप्रधान मोदींवर एकाधिकारशाही सुरु असल्याची टीका केली.

ओएनजीसीमध्ये 2500 जागांसाठी जंबो भरती, अर्ज प्रक्रियेला सुरूवात, वाचा कोण करू शकतं अर्ज?

आर्थिकदृष्ट्या प्रगती सुरु असल्याचा खोटा आव आणला जात आहे. रिझर्व्ह बँकेचा जो गव्हर्नर होईल तो राजीनामा देत असताना पाहायला मिळत आहे. त्याला दबाव सहन होत नाही. दोन दिवसांपूर्वीची बातमी अशी आहे की, लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत, म्हणून पुन्हा तीन लाख कोटींच्या नोटा छापून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

नोटा छापण्याची एक पद्धत असते, ती रुपयाची किंमत टिकवण्यासाठी. यांनी नोटा छापून घ्यायच्या त्या वाटायच्या, त्याच्यातून चलन फुगवटा होणार. पण चला निवडणुका तर निघून जाईल, ही आर्थिक बेशिस्त गेल्या नऊ वर्षात झाली आणि ती आता पुन्हा करण्याचा प्रयत्न असल्याची टीका यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या काळात जसा देश चालला होता, जशा योजना आणल्या होत्या तशी एकही योजना आणली नाही. उलट देश अधोगतीकडं सर्व अर्थांनी नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Tags

follow us