‘बायडेन यांना भारतात आणण्यासाठी 12 हजार कोटी मोजले का’? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल
Prakash Ambedkar On PM Modi : सध्या देशाची राजधानी दिल्लीत G-20 परिषद होत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जगभरातील नेते उपस्थित आहेत. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात काही करार होणार असल्याचं बोललं जातं आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) जोरदार टीका केली. जो बायडेन यांना भारतात आणण्यासाठी मोदींनी 12 हजार कोटींची किंमत मोजली का, असा सवाल त्यांनी केला.
जी-20 परिषदेसाठी जगभरातील दिग्गज नेते हजर आहेत. मात्र, या परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे अनुपस्थित आहेत. यावरूनच आंबेडकरांनी मोदींवर प्रश्नांचा भडिमार केला. आज माध्यमांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात डिफेन्स संदर्भातील डीलची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेत गेले तेव्हा याबाबत डील का झाली नाही, आजच का करताय? याचा खुलासा पंतप्रधान मोदींना करावा, अशी मागणी आंबेडकरांनी केली.
ते म्हणाले, हे डील होण्यासाटी जो बायडेन यांना भारतात बोलावले का? बायडेन यांना भारतात आणण्याची किंमत 12,000 कोटी रुपये आहे का? पूर्वी भारतीय लष्कर रशियन आणि भारतीय शस्त्रांवर अवलंबून होतं. आता तुम्ही अमेरिकन कंपन्यांना संरक्षणाचे कंत्राट देत आहात. बायडेन यांना भारतात आणण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना हे 12 हजार कोटींचं कंत्राट दिल्याटी माझी माहिती आहे, त्यामुळंच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी G20 परिषदेची भारत भेट रद्द केली असावी. रशियाला बाजूला करून तुमचा अमेरिकेला जवळ करयाचा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, हा एक मोठा बदल आहे. या बदलाची मिनिस्ट्रीमध्ये चर्चा झाली का? की, मोदी जेव्हा अमेरिकेत जायचे, तेव्हा तिथं टाऊनहॉलमद्ये भारतीयांशी बोलायला आणि तिकडून निवडणूक निधी गोळा करण्याची 12 हजार कोटी किंमत आहे का, याचा खुलासाही मोदींनी करावा, अशी मागणी आंबेडकरांनी केली.
₹12,43,98,97,50,000!
Is this cost of bringing Biden to India, Modi.
I am told that you are giving US-based companies the defence contracts worth ₹12,43,98,97,50,000, which may have led to Russia’s premier Putin cancelling his visit to the #G20Summit.
Is your policy of… pic.twitter.com/XSdkRrXSfT
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 9, 2023
याबाबत आंबेडकरांना एक ट्विट पोस्ट केलं. गेल्या दोन दिवसांपासून आंबेडकर जी-20 च्या निमित्ताने मोदी सरकारला अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी बायडेन यांना भारतात आणण्यासाठी ही ₹12,43,98,97,50,000 किंमत आहे? असं ट्वीट केलं. यावर आता मोदी सरकार काय उत्तर देणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.