Download App

राम शिंदेंच्या बालेकिल्यात विखेंकडून लोकसभेची ‘साखरपेरणी’

Ahmednagar : राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार यांच्याकडून तयारी सुरु आहे. यातच यंदा बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारांमध्ये देखील तिकीटबाबत संभ्रम आहे. दरम्यान नुकतेच नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्या बालेकिल्ल्यात साखरपेरणी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात देखील शिंदे यांच्या भाषणानंतर ते देखील नगर दक्षिणच्या लोकसभेच्या रेसमध्ये असल्याचे दिसून आले. तसेच शिंदे यांनी स्वतः देखील आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते, यामुळे विखेंची साखरपेरणी शिंदेंसाठी कशी ठरणार? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

दावोस दौऱ्यावरुन जुंपली; चित्रा वाघ सुप्रिया सुळेंना म्हणाल्या, ‘अडीच पैसा देण्याचीही दानत नाही…’

जामखेड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण खासदार सुजय विखे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विखे म्हणाले की, जामखेड तालुक्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू न देता प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे. याचेच फलित म्हणजे विकास कामांचा ओघ हा वाढतच आहे.

देवरा शिवसेनेत येऊन फसले? भाजपचा चार मतदारसंघांवर दावा, ‘दक्षिण मुंबई’साठी खास आग्रही

आज प्रत्येक गावामध्ये जात असताना कोणत्या न् कोणत्या प्रकारचा निधी देऊन, त्या गावातील विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे आणि ही वाटचाल यापुढेही सुरूच राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महिलांसाठी शनिशिंगणापूर(Shanishinganapur), शिर्डी तसेच पंढरपूर तुळजापूर अशा भक्तीपिठांची यात्रा आयोजित करुन महिलांना दर्शन घडवून आणले. यासोबतच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकाने दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करावी, या हेतूने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण नगर दक्षिणमध्ये साखर वाटप देखील करत आहोत.

दरम्यान लोकसभेची निवडणूक आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या संघटनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नगर दक्षिणसाठी भाजपकडून सुजय विखे यांच्यासह राम शिंदे हे देखील इच्छुक आहेत.

हे सगळं सुरु असताना मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांचं नाव देखील लोकसभेसाठी चर्चेत असल्यानं नेमकं कोणाचं तिकीट फायनल होणार? हे येत्या काळातच स्पष्ट होईल. मात्र निवडणुकांच्या अनुषंगाने राम शिंदे हे देखील सरसावले आहेत. शिंदे यांनी देखील वाढदिवसाच्या निमित्तानं मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

follow us