Download App

पावसाने नगरकरांचे हाल ! अखेर महानगरपालिकेला आली जाग, तातडीने उपाययोजना करणार

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Rain: नगर शहरात (Ahmednagar City) शनिवारी तब्बल तीन तास मुसळधार पाऊस झाला. शहरातील चारही महसूल मंडळात अतिवृष्टीचे झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पण या पावसाने नगरकरांचे मोठे हाल झाले. रस्ते पाण्याखाली गेले होते. कापड बाजारात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. अनेक नागरिकांचे हाल झाले. तीन महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसाने दाणदाण उडविली. यात महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे पितळही उघड पडले. नगरकरांनी महानगरपालिकेविरोधात Ahmednagar Corporation)थेट रोष व्यक्त केला. नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर अखेर मनपा आयुक्तांनी रविवारी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापनाची (Disaster Management) बैठक घेतली.

Ahmednagar Rain : नगर शहराला पावसाचा तडाखा! अनेक ठिकाणी अतिवृष्टी; जिल्ह्यातही कोसळ’धार’

नगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तातडीची अधिकारी, विभाग प्रमुखांची आपत्कालीन व्यवस्थापन बैठक बोलाविली. या बैठकीत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीत तातडीची व्यवस्था करा, नागरिकांना सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे, नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या भावनांचा सन्मान ठेवत प्रत्येक ठिकाणी मदतकार्य पोहोचले पाहिजे. तसेच कर्मचारी वर्ग संख्या वाढवा, यंत्र सामुग्री वाढवा असे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले.

Ahmednagar Rain : नगरमध्ये धुव्वाधार पाऊस, शहरातील रस्त्यांवर ‘महापूर’

ते म्हणाले, शनिवारी सर्व अधिकारी,प्रभाग अधिकारी ,आपत्ती व्यवस्थापन, उद्यान विभाग, आरोग्य विभाग, सर्व कर्मचारी यांनी तातडीची कार्यवाही चांगली केली परंतु याही पेक्षा जास्त सतर्क राहून नागरिकांच्या अडचणी सोडवून मदतकार्य प्रभावी रीतीने झाले पाहिजे.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, अजित निकत, घनकचरा विभाग प्रमुख सहायक आयुक्त सपना वसवा, आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, जल अभियंता परिमल निकम उपस्थित होते.

मनपा अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्यक्षात फील्डवर जाऊन काम करावे, जेणेकरून जनतेचे प्रश्न तातडीने सोडविले जातील, नगर शहरातील जनतेच्या अपेक्षा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत ते सोडण्यासाठी प्रत्येकाने काम करावे प्रश्न निर्माण होण्याआधीच सोडविण्याचे काम करावे, शहरातील जनतेला सुरक्षा देण्याचे काम आपले आहेत, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. ‘

https://youtu.be/3UoWv9XTJzE?si=2VIeNm1AxQhVwQ4r

आपत्कालीन संपर्क क्रमांक

अहमदनगर महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्रमांक

प्रभाग अधिकारी संजय उमाप मोबाईल- -8806328728

प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 2 प्रभाग अधिकारी राकेश कोतकर मोबाईल -9403377725

प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 प्रभाग अधिकारी मेहेर लहारे मोबाईल -8379897111

प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 4, प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी मोबाईल- 9922439951

आपत्कालीन व्यवस्थापन –
अग्निशमन विभाग प्रमुख

शंकर मिसाळ : मोबाईल – 9561004637,

उद्यान विभाग प्रमुख- शशिकांत नजन

मोबाईल- 9850146611,
केडगाव विभाग – सुखदेव गुंड
मोबाईल- 7020564864

Tags

follow us