Ahmednagar Rain : नगरमध्ये धुव्वाधार पाऊस, शहरातील रस्त्यांवर ‘महापूर’
Ahmednagar Rain : अहमदनगर शहर (Ahmednagar City) व जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.शहरात तर तब्बल तीन तास मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला आहे.रात्री उशीरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात झालेल्या पावसामुळे सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यात काही भागात पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरले आहे.
Nagpur : दोन तासांचा पाऊस दोन महिलांच्या जीवावर बेतला; 400 जणांची सुटका; जनावरांचीही जिवीत हानी
पुढील दोन दिवस जिल्ह्यात विजेच्या कडकटांसह वादळी वाऱ्याच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अहमदनगर शहर व जिल्हामध्ये गेले दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती.परंतु तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास जोरदार असे पावसाचे आगमन होत आहे. आज चार वाजल्यापासून जोरदार असा पाऊस सुरू झाला.
Nagpur Rain Update : नागपुरात नेमकी परिस्थिती कशी?; फडणवीसांनी सांगितली ग्राउंड रिअॅलिटी
तब्बल तीन तास शहरात तुफान पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते.शहरातील अंतर्गत रस्ते, महामार्गांवरून पाणी वाहत होते. शहरातील रस्ते नाही, तर नद्याच वाहत होत्या, असे चित्र होते.त्याचबरोबर शहरातील नालेही वाहत होते. त्यात अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणीच रस्त्यावर आले होते. शहरातील सारसनगर, सावेडी भागातील रस्त्यांवरील पाणी वाहत होते.
दुकानांमध्ये पाणी
कापड बाजार बाजारपेठ असलेल्या परिसरामध्ये दुकानांमध्येही पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.कापड बाजार येथील नागरिकांनी महापालिकेच्या विषयी रोष व्यक्त केला आहे. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांच्या दुकानातील वस्तूही वाहून गेल्या आहेत. यामुळे दुकानदार डोक्याला हात लावून बसलेले पाहायला मिळतात.
गुडध्याभर पाण्यातून वाहने
जोरदार पावसामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर गुडघ्या इतकी पाणी साचले होते. नव्याने झालेल्या उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यांवरून जोरदार पाणी वाहत होते. त्यातून वाहने नेत असताना अनेक वाहने रस्त्यावर बंद पडली. त्यामुळे नगर-पुणे, नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. नगर-मनमाड महामार्गावर सावेडी भागात महामार्गावरून पाणी वाहत होते.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा नदीला पूर आला आहे. नगर जिल्ह्यात उद्याही मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. तब्बल तीन महिने पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पारनेर, नगर, संगमनेर तालुक्यातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.